क्राइम

औद्योगिक वसाहतीत कुजलेल्या अवस्थेत आढळला४० वर्षीय इसमाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम!

पुसद : ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील घाटोडी औद्योगिक वसाहत क्षेत्रातील बंद पडलेल्या पक्के बांधकाम असलेल्या कॉटरच्या स्लॅबवर एका अज्ञात ४० वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला होता.हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने या मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते त्यावेळी पोलिसांनी तत्काळ सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना त्यांच्या हद्दीत कोणताही एखाद्या इसम मिसिंग कींवा काही माहिती असल्यास शोध घेण्याचे आवाहन केले आहे. परंतु औद्योगिक वसाहतीतील निर्जन भागात एका बंद असलेल्या कॉटरच्या बांधकामावरील स्लॅबवर कुजलेल्या अवस्थेत या इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. परंतु तात्काळ या इसमाची ओळख पटली असून हा इसम मधुकर नगर येथील रहिवासी असल्याचे माहिती उघड झाली आहे मात्र त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.

याबाबत प्राप्त पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ दिलेली माहिती अशी की,आज सकाळी अंदाजे ९:०० वाजण्याच्या सुमारास पुसद ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घाटोडी औद्योगिक वसाहतीत पक्के बांधकाम असलेल्या बंद पडलेल्या कॉर्टरच्या स्लॅबवर एक ४० वर्षीय पुरुष जातीचा कुजलेल्या अवस्थेत व प्रेत चित्त  अवस्थेत मृतदेह आढळून आला पोलिसाच्या प्रथम दर्शनीय पाहणीमध्ये या मृतदेहाची उंची ५ फूट ३ इंच, लांब केस, चेहरा लांबट कुजलेला, अंगात आकाशी रंगाचा टी-शर्ट ज्यावर श्री सुपीनाथ गणेश मंडळ अमानी असे छापलेले आहे,कमरेवर लाल रंगाचा करदोडा, पांढऱ्या विटकरी रंगाची अंडरवेअर ज्यावर लाल रंगाचे इलॅस्टिक त्यावर macho असे नाव दिसत होते, दोन्ही पायाच्या मांड्या कुजलेल्या दिसत होत्या पायात गुडघ्याच्या खाली नेव्ही ब्ल्यू रंगाची पॅन्ट घातलेली होती ती पॅन्ट सुद्धा अर्धवट खाली आलेली होती, उजव्या पायासोबत बांधकामामधील लोखंडी गजाच्या तुकड्यासह अंकल जवळ पांढऱ्या रंगाच्या दुपट्ट्याने गाठ मारलेली दिसत होती तसेच डाव्या पायाच्या अंकल जवळ शीला कुजलेला दिसुन आली.स्थानिकांच्या मते गेल्या काही दिवसांपासून या भागात दुर्गंधीचा तीव्र त्रास जाणवत होता. मात्र निर्जन परिसर आणि हे बांधकाम दुर्लक्षित भाग असल्याने कोणाच्याही लक्षात हा प्रकार लवकर आला नाही. अखेर दुर्गंधी असह्य झाल्यानंतर स्थानिकांनी शोध घेतला असता हा भीषण प्रकार समोर आला आहे.

त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संबंधित अज्ञात इसमा बाबत सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सूचना दिली होती की संबंधित वर्णाचा इसम आपल्या ठाण्याच्या हद्दीत मिसिंग असेल तर संपर्क साधावा परंतु त्यावेळी तात्काळ वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मधुकर नगर बिटमधिल रहिवासी असलेला संतोष अजबराव जाधव असल्याची माहिती पोलिसांना मिळाली याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेहाच्या कपड्यावरून नातेवाईकांनी ओळख पटविली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुजलेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह घातपात आहे की काय हे केवळ शवविच्छेदन अहवाल, फॉरेन्सिक तपासाचे निष्कर्ष आणि घटनास्थळावरील पुराव्यांवरूनच निश्चित केले जाऊ शकते पण प्राथमिक अवस्थेत केवळ मृतदेहाच्या स्थितीवरून काही ठोस सांगणे कठीण आहे. मात्र त्याच्या मृत्यूचे गूढ कायम आहे.पोलिसांनी सर्व शक्य दृष्टीकोनातून तपास सुरू  केला आहे.या घटनेचा तपास ठाणेदार आशिष चौधरी, सपोनि राहुल देशमुख, सपोनि रवी चव्हाण, सफौ.ससाने स.फौ शेख मसुद ,पो. कॉ. संदेश पवार, अदी पोलीस कर्मचारी करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close