अयोध्या श्रीराम मंदिर चोरी प्रकरणी पुसद काँग्रेस आक्रमक; काँग्रेस जिल्हाध्यक्ष ऍड. सचिन नाईक तथा प्रदेश महासचिव डॉ. मोहम्मद नदीम यांच्या उपास्थितीत सत्याग्रह आंदोलन व निवेदन

पुसद:अयोध्या येथील श्रीराम मंदिर परिसरात घडलेल्या चोरी च्या घटनेच्या निषेधार्थ शहर व तालुका काँग्रेस कमिटी,पुसद यांच्या वतीने आज (दि. १४ जुलै २०२६) पुसद शहरातील आझाद चौक येथील श्री.बालाजी मंदिरासमोर सत्याग्रह आंदोलन करून संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ऍड. सचिन नाईक यांच्या नेतृत्वात तसेच प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. मोहम्मद नदीम यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या या आंदोलनात काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. आंदोलनादरम्यान श्रीराम मंदिर परिसरातील चोरीच्या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी श्रीराम मंदिरासह देशातील सर्व धार्मिक स्थळांची सुरक्षा अधिक बळकट करावी,चोरीच्या घटनेचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी,तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.या प्रसंगी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झिया शेख ,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ज्ञानदीप कांबळे, अल्प. काँग्रेस महासचिव सय्यद इस्तियाक,युवक काँग्रेस महासचिव सुजित मानकामे,तहेसीन खान,महिला काँग्रेस अध्यक्ष नगरसेविका योगिता नेमायते,सेवादल अध्यक्ष संजय कन्हेड,सय्यद जानी,युवक विधानसभा अध्यक्ष अभिलाष खैरमोडे,मसूद मिर्झाप्रकाश नेमायते ,चेतन कांबळे सुमेध कुलदिपके , शांडी कांबळे , अंकु बिरगड ,बौधी इंगोले काँग्रेसचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



