पुसद शहरातील पाणीपुरवठा योजना वादात; योजनेच्या कामांच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह! निखिल चिद्दरवार यांची न.प.च्या मुख्यधिकाऱ्याकडे केली तक्रार दाखल!

पुसद : शहरासाठी पाणीपुरवठा करण्यासाठी सुरू असलेल्या महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानातील योजना यशस्वी होण्याच्यादृष्टीने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत माजी विरोधी पक्षनेते तथा माजी नगरसेवक निखिल अनिल चिद्दरवार यांनी चक्क नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्याकडे वारंवार तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने पुन्हा दुसरे स्मरणपत्र दिले आहे. संबंधित कंत्राट दाराकडून करारातील अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचा या तक्रारीत गंभीर स्वरूपाचा आरोप करण्यात आला असून या योजनेची कामे चांगल्या दर्जाची होतील दक्षता घ्यावी त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुसद नगर परिषदेची मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या स्मरणपत्रानुसार, पुसद शहरातील बहुचर्चित महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानाअंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम गुजरात येथील ‘हिर कन्स्ट्रक्शन’ (Heer Construction) या कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. परंतु, या कामात अनेक त्रुटी असल्याच्या तक्रारी समोर आल्या असून, नगर परिषदेसोबत ‘शहराच्या पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या योजनेतील ‘करारारानुसार’ संबंधित अधिकाऱ्याने कामाचे आदेश दिले होते मात्र, संबंधित कंत्राटदराने प्रत्यक्ष काम करताना करारातील अटींचे पालन होत नसल्याचे तक्रारकर्त्यानी वारंवार निदर्शनास आणून देऊनही संबंधित प्रशासनाकडून किंवा कंत्राद्वाराकडून प्रभावी प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही करारात नमूद केलेल्या अटींचे पालन होत नसल्याचा आणि कामात निकृष्ट दर्जाचे पाइप वापरले जात असल्याचा गंभीर आरोप स्थानिक माजी नगरसेवकांनी केला आहे तर निकृष्ट पाइपलाइनमुळे भविष्यात पाणीपुरवठा विस्कळीत होणे आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कंत्राट दादा केलेल्या कामाची तसेच कामात हलगर्जीपणा होत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची तातडीने व सखोल चौकशी करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा यवतमाळ शहरात पाणीपुरवठ्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने यापूर्वी अशाच प्रकारची घटना घडल्याची माहिती आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ या पाणीपुरवठ्याच्या कामाची दाखल घेऊन पुसद शहरात अशाप्रकारची घटना घडली किंवा नागरिकाच्या जीवित्वास धोका निर्माण होईल अशी परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित न.प. प्रशासनाची व संबंधित कंत्राटदाराची राहील..पण या पाणीपुरवठा योजनेच्या कामाबाबत नगरपरिषद प्रशासन काय ठोस पाऊल उचलते याकडे पुसद शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पुसद शहरासाठी पाणीपुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या योजनेतील कामात सबंधित कंत्राटदाराचा कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. करारानाम्यानुसार नियम -अटींचे काटेकोर पालन करूनच संबंधित कंत्राटदराने कामे करावी सर या कामात अनियमितता केली तर संबंधितांवर न.प प्रशासनाने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मी केली आहे.
निखिल अनिल चिद्दरवार, माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक, नगर परिषद पुसद.



