सामाजिक

वृध्द आईचा सांभाळ न करणाऱ्या शिक्षक दांपत्यास न्यायालयाचा दणका; दरमहा पंधरा हजार रुपये पोटगी देण्याचा कोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय!

आता आई-वडिलांचा सांभाळ न करणे पडणार महागात!

पुसद : भारतीय संस्कृतीत श्रावणबाळाचे उदाहरण आजही आदर्श पुत्रत्वाचे प्रतीक मानले जाते.आपल्या आई-वडिलांची सेवा, निःस्वार्थ प्रेम आणि त्याग यामुळे तो इतिहासात अमर झाला आहे. आजच्या काळात जेव्हा वृद्ध आई-वडिलांची उपेक्षा केली जाते, त्यांच्यावर अन्याय होतो, तेव्हा श्रावणबाळाची कथा अधिक महत्त्वाची ठरत आहे. याचे कारण अलीकडील काळात मुलांनी वृद्ध माता-पित्यापासून संपत्ती मिळविणे आणि त्यानंतर त्यांना सोडून देणे, वृद्धाश्रमात ठेवणे आणि त्यांना सहकार्य न करणे, हे प्रकार अलीकडील काळात वाढत चालले आहेत. एका अर्थाने हे आधुनिक समाजाचे विकृत रूप आहे. वृद्ध आई-वडिलांची सेवा करण्याऐवजी त्यांच्याकडून संपत्ती आपल्या नावावर करून घेतल्यानंतर त्यांना वार्‍यावर सोडण्याची प्रवृत्ती वाढत आहे. काहीजण वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देतात, तर काहीजण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात. संयुक्त कुटुंबपद्धतीचा र्‍हास आणि एकल कुटुंबसंस्थेचा वाढता प्रभाव, यामुळे वृद्धांचे जीवन अधिक त्रासदायक बनले आहे.पोटच्या मुलाकडून होणार्‍या या अन्यायाविरोधात काहींनी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावल्याची उदाहरणे आहेत त्याचाच परिचय आपल्या तालुक्यात घडला आहे. पुसद तालुक्यांतील माळ पठारावरील कन्हेरवाडी येथील लक्ष्मीबाई पांडुरंग माघाडे या ७० वर्षाच्या वृध्द आईने २०२१साली न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता पुसद येथील विद्यमान चौथे कौटुंबिक न्यायालयात मुलाकडून पोटगी मिळवण्यासाठी अर्ज केला होता. या ज्येष्ठ मातेला एक मुलगा आहे आणि तोही विवाहित असून मुलगा व सुन शासनाच्या विभागात शिक्षकी पदावर कार्यरत आहेत त्यांना दरमहा वेतनही चांगले मिळते परंतु हे दांपत्य वृध्द आईचे पालनपोषण करण्यास त्यांनी नकार दिल्याने वृध्द आईने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता त्यावेळी पुसद न्यायालयातील वि.चौथे न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.अमीता यु.यादव मॅडम यांनी या प्रकरणात अंतिम आदेश पारित करून लक्ष्मीबाई पांडुरंग माघाडे यांनी मुलगा व सूनेच्या विरुद्ध केस दाखल केली तेंव्हापासून आजपर्यंत दरमाह १५हजार रुपये पोटगी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय पुसद न्यायला दिला आहे त्यामुळे वृद्धापकाळात मुलांनी जन्मदात्या आई-वडीलाचे पालन, पोषण न करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत झेप न्यूज ला न्यायालयाच्या सूत्राने दिलेली माहिती अशी की, पुसद तालुक्यातील माळ पठारावरील कन्हेरवाडी येथील वृद्ध महिला लक्ष्मीबाई पांडुरंग माघाडे वय ७० वर्षे यांचा मुलगा तुकाराम पांडुरंग माघाडे वय४८ वर्षे तसेच सून सौ. प्रमिला तुकाराम माघाडे वय ४२ वर्षे हे वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड तालुक्यात शिक्षक पदावर कार्यरत आहेत. नोकरी लागल्यापासून आपल्या वृद्ध आईला त्याने एक रुपयाची मदत केली नाही, शिवाय तिच्या प्रपंचाकडे लक्ष दिले नाही. आईने जमेल तशी मोलमजुरी करून वयाच्या ७० वर्षांपर्यंत उदरनिर्वाह चालविला. आता वृद्धापकाळात मोलमजुरी करण्याची परिस्थिती राहिली नाही. परिणामी, आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी कोणताच आधार उरला नाही. मुलाला आईने अनेकदा आपल्या प्रपंचासाठी मदत करण्याची विनवणी केली. मात्र, आईच्या मागणीकडे, बोलण्याकडे शिक्षक दांपत्याने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले त्यामुळे या वृद्धाआईचे अखेर जगणेच कठीण झालेल्या आईने मुलाविरोधात संघर्ष करण्याचा निर्णय घेतला हतबल झालेल्या वृध्द आईने न्यायालयात हक्क मागण्यासाठी पुसद येथील न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज क्रमांक ८२/२०२१ नुसार खावटीची रक्कम (पोटगी) मिळण्याकरिता धाव घेतली होती.त्यावेळी स्वतःच्या जन्मदात्या७० वर्षाच्या वृध्द आईचा सांभाळ न करणाऱ्या या शिक्षक मुलाला आणि सुनेला न्यायालयाच्या निकालाने चपराक बसविली त्यामुळे पुसद न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा पुसद तालुक्याच्या जिल्ह्यात सुरू आहे. ७० वर्षीय वृद्ध आईला पुसद न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने निकाल देत असतांना मुलगा व सुन शिक्षकी सारख्या पदावर कार्यरत असूनही वृध्द आईचे पालनपोषण करण्यास तो व त्याची पत्नी टाळाटाळ करीत असल्याने पुसद येथील ४ थे न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी (न्यायाधीश अमिता यु.यादव मॅडम) यांच्या न्यायालयात झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर, न्यायालयाने वृद्ध आईची बाजु ग्राह्य धरली. न्यायालयाने अंतिम आदेश पारित करत, मुलगा आणि सुनेने आईला या प्रकरणात केस दाखल केल्याच्या तारखेपासून डिसेंबर २०२१पासुन दरमहा १५ हजार रुपये पोटगीची रक्कम द्यावी, असा महत्त्वपूर्ण निकाल दिला. प्रकरणात वृध्द आईच्या वतीने ॲड. शाहेद शेख यांनी अत्यंत सक्षमपणे बाजु मांडून आईला न्याय मिळवून दिला आहे.पण सध्या समाजात संयुक्त कुटुंब व्यवस्था कमकुवत होत चाल्यामुळे एकटे पडलेल्या आबालवृद्धांना मदत करण्याच्या उद्देशाने हा महत्वपूर्ण निकाल मानला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close