क्राइम

पुसद शहरात ‘थर्टी फर्स्ट’ते नववर्षाच्या स्वागताच्या वेळी विस टवाळखोरांवर कारवाई; शहर पोलिसांची धडक मोहीम!

पुसद : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत टवाळखोरांचे वाढते प्रकार लक्षात घेऊन ‘थर्टी फर्स्ट’ च्या दिवसांपासून ते नववर्षाच्या पूर्वसंध्येला शहर पोलिसांनी टवाळखोरविरोधी व्यापक कारवाई राबविली. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करीत आरडाओरड करणे, गोंधळ घालुन नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे तसेच शांततेचा भंग करणाऱ्या २०  टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,दि. ३१ डिसेंबर २०२५ रोजी थर्टी फर्स्टच्या दिवसी सायंकाळचे ५:०० वाजण्यापासून ते नव वर्षाचे स्वागत शांततेत पार पडावे यासाठी लोकांनी सार्वजनिक रोडवर व सार्वजनिक ठिकाणी येवून गैर वर्तन व करू नये. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी जमून आरडा ओरडा करू नये. नवीन वर्षाचे स्वागत सर्वांनी आपआपल्या घरी शांततेत करावे. कोणताही अनुचित प्रकार घडु नये. नव वर्षाचे स्वागत शांतेतत पार पडावे या हेतुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी कुमार चिंता साहेब, पोलीस अधिक्षक, जि. यवतमाळ, अशोक थोरात साहेब, अपर पोलीस अधिक्षक, जि. यवतमाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद विभाग हर्षवर्धन बि.जे. साहेब, यांच्या आदेशाप्रमाणे व मार्गदर्शनात मोठया प्रमाणावर अधिकारी व कर्मचारी यांचा पुसद पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंदोबस्त लावण्यात आला होता. सदर बंदोबस्ताचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे पुसद शहर हे प्रभारी होते.सदरचे बंदोबस्ताचे दरम्यान पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांनी पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्टाफसह पेट्रोलिंग करीत असतांना शिवाजी वॉर्ड, मोतीनगर व सुभाष चौक ईत्यादी सार्वजनिक ठिकाणी आरडा ओरडा करून शांतता भंग करतांना मिळून आलेल्या एकूण २० ईसमांवर कलम ११०, ११७ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये प्रतिबंधक कारवाई करून झगडा भांडणासारखा कुठलाई अनुचित प्रकार घडू दिला नाही. सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणारे, आरडाओरड करून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे २० टवाळखोर ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई कुमार चिंता, पोलीस अधिक्षक, जि. यवतमाळ, अशोक थोरात, अपर पोलीस अधिक्षक, जि. यवतमाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, पुसद विभाग हर्षवर्धन बि.जे.. यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close