पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत धारदार लोखंडी तलवारी बाळगणा-यावर गुन्हा दाखल; स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई!

पुसद :शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेंबाळपिप्री रोडवर सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याच्या उद्देशाने एक इसम खाकी रंगाच्या बॉक्समध्ये दोन धारदार लोखंडी तलवारी अवैधरित्या बाळगून असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलिस पथकाला मिळाली त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असता त्या इसमाची झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे दोन तलवारी अवैधरित्या मिळुन आल्याने पोलीसांनी त्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्यावर शहर पोलीस स्टेशन पुसद येथे शस्त्र कायदा ४,२५, अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूत्राने ‘झेप न्यूज’ दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, अवैध शस्त्र, अवैध उत्खन्न सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंद्याचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या आहेत.दि,१४डिंसेबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात अउघड गुन्हे, आरोपी शोध, कामी पुसद ते शेंबाळपिंपरी रोडने पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा कडून माहीती मिळाली कि, इसम नामे आकाश राजू पवार यांच्याकडे दोन खाकी रंगाचे बॉक्स असून त्यामध्ये लोखंडी तलवार बाळगून तो पुसद ते शेंबाळपिंपरी रोडवर थांबला असून तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दखलपात्र गुन्हा करण्याची शक्याता आहे. अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह पुसद शेंबाळपिंपरी रोड येथे जावून इसम नामे-आकाश राजू पवार यास ताब्यात घेवून त्याच्या जवळील खाकी रंगाच्या बॉक्स ची पाहणी केली असता त्यामध्ये दोन मॅन लावलेल्या गोल मुठ असलेल्या दोन धारदार लोखंडी तलावरी किंमत ६०००- रु मिळून आल्याने ते जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-आकाश राजू पवार वय ३४ वर्ष, रा. भोजला ता. पुसद जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन पुसद शहर येथे कलम ४,२५,भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात सा, मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, स. फौ मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चा.पो. उप.नि. रविद्र शिरामे, चापोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



