शैक्षणिक

खाजगी शाळेतील निष्काळजी कारभार विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतला! विद्यार्थ्यांच्या पालकांकडून शाळेच्या संचालक मंडळासह तथा मुख्याध्यापक व शिक्षकांवर कार्यवाहीची मागणी!

खाजगी शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षाचा मुद्दा ऐरणीवर;शिक्षण विभागाने गंभीर दखल घेण्याची गरज!

पुसद : शहरातील नामांकित ‘जेट किड्स’ इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिकणारा विद्यार्थी पडल्याने त्याचा अपघात झाला शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया होऊन त्याच्या शरीरातील महत्त्वाचा ऑर्गन काढल्याने त्याला आयुष्यभराची दुखापत झाली त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेतील मुख्याध्यापक शिक्षकासहसंचालक मंडळाचा निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याने या सर्व कारवाईची मागणी करण्यात आली.या घटनांमुळे खासगी शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांकडून भरमसाट फी घेणाऱ्या शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केली जात नाही, शिक्षण विभागांचे अशा शाळांकडे दुर्लक्ष होत असल्याने मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. आपला पाल्य इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे राहू नये, यासाठी खासगी इंग्रजी आणि नामाकिंत शाळांमध्ये प्रवेश घेण्याकडे पालकांचा कल वाढला आहे. याच संधीचा फायदा काही खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळाकडून घेतला जात आहे. असाच प्रकार शहरातील नामांकित खाजगी जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचे संचालक मंडळ तथा शाळेच्या प्राचार्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात यावी. याकरिता विद्याथ्यांचे पालक मनीष सुभाषराव खंदारे यांनी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या खाजगी शाळेने दिवाळीची सुट्टी असतानाही एक्स्ट्रा क्लासेस घेण्याच्या नावाखाली शाळेच्या प्राचार्यांनी नोटीस बजावून वर्ग १० चे विद्याथ्यांनी एक्स्ट्रा क्लासेस करता उपस्थित राहण्याचे कळविले. त्याच अनुषंगाने वर्ग १० वी मधील विद्यार्थी एक्स्ट्रा क्लासेस करिता शाळेमध्ये जात होते त्यावेळी दि. २५ ऑक्टोबर ते २७ ऑक्टोबर पर्यंत वर्ग दहाच्या विद्याथ्यांचे एक्स्ट्रा क्लासेस असल्यामुळे विद्यार्थी हे एक्स्ट्रा क्लासेस साठी शाळेत गेले असता संबंधित शिक्षकांनी एक्स्ट्रा क्लास घेतले नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळेच्या मैदानावर जमा होऊन खेळत होती. त्यावेळी शाळेच्या गेटवर सुरक्षारक्षक असणे आवश्यक असताना किंवा शिक्षकही ग्राउंडवर हजर नसल्याने विद्यार्थी खेळता खेळता एक दुसऱ्याला धक्के देऊ लागले त्यावेळी दहाव्या वर्गातील विद्यार्थी अमेय मनीष खंदारे यास जोराचा धक्का लागल्यामुळे तो जमिनीवर पडला असता त्याला गंभीर दुखापत झाली. त्यावेळी त्याला तात्काळ त्याच अवस्थेमध्ये शाळेचे संचालक डॉ. मालपाणी यांच्या खाजगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यावेळी त्याला डॉक्टरांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना त्या विद्यार्थ्यांची सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला तेथून त्याला इतरत्र शहरातील मोठ्या खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. त्यावेळी त्याच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली व त्याच्या शरीरातील महत्त्वाचा ऑर्गन काढण्यात आला त्यामुळे या विद्यार्थ्याला जीवनभर अपंगत्व प्राप्त झाले. शाळेच्या व शिक्षकांच्या तसेच संचालक मंडळाच्या बेजाबादपणा व निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्याच्या पालकांना मोठा शारीरिक मानसिक नाहत्राक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला.या शाळेतील गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना शाळेत एक्सटा क्लासेस साठी बोलावून विद्याथ्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेचे संचालक तथा मुख्याध्यापक संबंधित शिक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप या विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला असून संबंधित संचालक तथा शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षकावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी करणारे निवेदन पोलीस स्टेशन पुसद यांचेकडे दिल्या आहे. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे सुद्धा मागणी केली आहे. पोलीस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्व पालकाचे लक्ष लागले आहे.या घटनांमुळे खासगी शाळांमधील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पालकांकडून भरमसाट फी घेणाऱ्या शाळांमध्ये मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना केली जात नाही, संबंधित शिक्षण विभागांचे अशा शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने मुलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक वेळ हा पालकांपेक्षा शिक्षकांच्या सानिध्यात अधिक असतो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी ही संबंधित शाळांवर येते. बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्याच्या सुरक्षेसाठी वेगळी काहीच व्यवस्था नसते. शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे, विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना वेगळे बाथरूम, शाळेच्या गेटवर सुरक्षारक्षक,असणे जरुरी आहे.शाळेच्या इमारतीचे दरवर्षी ऑडिट करणे, शाळेतील अग्निशमन व्यवस्थेचे नूतनीकरण केल्या जात नाही. खासगी शाळा हे नियम पायदळी तुडवतात आणि त्याचा परिणाम शाळेतील विद्यार्थ्यांना भोगावा लागतो. खासगी शाळांमध्ये काय सुरु आहे. या शाळांमध्ये नियमाचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी संबंधित शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी शाळांना कधी भेटी देत नाहीत. अशा खाजगी शाळा चे हे संचालक मंडळ कार्यालयात बसून कागदोपत्री चिरीमिरी देऊन व्यवस्थापन करताना दिसतात व शिक्षण विभाग धृतराष्ट्राचे सोंग घेते त्यामुळे या संधीचा गैरफायदा घेत खासगी शाळा व्यवस्थापनाची मनमानी मात्र सुरु बहुतांश खासगी शाळा संस्थानिक बनल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून याची गंभीर दखल संबंधित विभागाने घेण्याची गरज आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close