ईतर

पुसद शहरात महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी!

पुसद : शहरात महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने‌ महात्मा बसवेश्वर जयंती मोठ्या हर्षउलासात अत्यंत भक्तिमय, उत्साहपूर्ण आणि एकात्मतेच्या भावनेने साजरी करण्यात आली.या प्रसंगी समाजातील प्रत्येक घटकाने मनापासून सहभाग नोंदवून “एक दिवस समाजासाठी” ही भावना प्रत्यक्षात उतरवली, हे पाहून मन अभिमानाने भरून आले.

महात्मा बसवेश्वरांच्या समता, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा प्रकाश आजही आपल्या कार्यातून झळकत असल्याचे यावेळी प्रकर्षाने जाणवले. सकाळी ८:३० वाजता मोटार सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले ही रॅली शहराच्या प्रमुख मार्गातून मार्गक्रमण करीत श्रीरामपुर येथील महात्मा बसवेश्वर महाराज चौकामध्ये पुजन व फलकास हार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपतींना अभिवादन करून बालाजी अग्रो येथे महात्मा बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमेचे पूजन केले परत लिंगायत मठा मध्ये रॅलीचे विसर्जन झाले त्यानंतर महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे विधीवत पूजन व महाआरती महाप्रसादाचे यजमान सौ सुरेखाताई मोहनआप्पा वाकोडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संपुर्ण लिंगायत समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी सर्व मानव समान आहेत हा संदेश समाजाला दिला.

त्यांनी जन्मावर आधारीत उच्च निच भेद नाकारून कायकवे कैलास ( श्रम हिच पुजा ) ही संकल्पना मांडली त्यांचे मते कोणतेही काम लहान किंवा मोठे नसून प्रत्येकाने प्रामाणिक पणे श्रम करून स्वाभियानाने जगावे हा त्यांचा मुलभुत विचार होता जातीभेद अस्पृश्यता दूर करण्यासाठी त्यांनी अनुभव मंटप स्थापन करून सर्व जाती – धर्मातील लोकांना समान व्यासपीठ उपलब्ध करून दिले . बाराव्या शतकात स्थापन झालेल्या अनुभव मंटप हेच खऱ्या अर्थाने जागतीक लोकशाहीचे पहिले मंदिर मानले जाते त्यांनी आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देत सामाजिक बंधने मोडण्याचा प्रयत्न केला समता, बंधुता आणि न्याय या मुल्यावर आधारीत त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

या यशस्वी आणि संस्मरणीय आयोजनासाठी वीरशैव लिंगायत समाज ,महात्मा बस्वेश्वर महाराज उत्सव समिती, श्री मारोती मंदीर व श्री लिंगायत मठ, वीरशैव लिंगायत महिला मंडळ, पुसद व श्रीरामपुर, बोरी मुखरे, कारला देव, मांडवा,रोहडा, पिंपळखुटा, हुडी, चिकणी येथील सर्व समाज बांधव आणि सल्लागार समिती यांचे मिळालेले मोलाचे सहकार्य अत्यंत कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. त्यांच्या अथक परिश्रम, नियोजन आणि समर्पणामुळे हा सोहळा अधिक भव्य आणि देखणा झाला, त्याबद्दल मनःपूर्वक आभार व कृतज्ञता.

तसेच  शोभायात्रेमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांचे पालखी दर्शनाकरीत शिवसेना नेते श्री राजन मुखरे, शिक्षण प्रसारक मंडळाचे डॉ आनंद मुखरे, निरंजन मुखरे,पुसद नगर परिषद अध्यक्षा सौ मोहिणी इंद्रनील नाईक, पाणी पुरवठा सभापती श्री राजेश साळूंखे, बाधंकाम सभापती श्री अभिजित पानपट्टे, नगर सेवक श्री ऋषीकेश पंडीतकर, नगर सेवक श्री अक्षय महाकाळ, श्री निशांत बयास यांनी महात्मा बस्वेश्वर महाराज यांना अभिवादन केले सर्व मान्यवर मंडळीचे समाजाच्या वतीने स्वागत करण्यात आले. समाज बांधवा करिता थंडपेयाची व्यवस्था करणारे, डॉ सुनील जोशी परिवार आणि श्री व सौ भारत पाटील ,मेन रोड येथे व्यवस्था केली हॉटेल देहली वाला यांचे कडून थंडगार मठ्ठाचे ची व्यवस्था करणारे नागठाणे बंधू संपुर्ण शोभायात्रेला पुसद मधील राजकीय, सामाजिक संघटना द्वारे थंडपाणी वाटप करणात आले दासोह (महाप्रसाद) ला सहकार्य करणारे अन्नदाते सौ सुरेखाताई व श्री मोहन जयवंतराव वाकोडे सर ,संपुर्ण दिवस तसेच वारकरी दिंडी मंडळ, आणि विशेष आर्कशन महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सवा द्वारा कर्म हिच पुजा हा मोलाचा

संदेश देणारी अनुभव मंटप( आधुनिक ससंदे) ची झाकी, चिमुकल्यांचे विशेष आभार तुमच्या सजीव देखाव्याने उपस्थीतांना वेगळीच उर्जा मिळाली, कु दुर्वा, कु श्रावणी वसेकर, कु अवनी आजेगावकर, आनंद महाजन, कु शामभंवी वद्राबादे चि शिवांश वद्राबादे, चि लक्ष आजेगावकर,कु सिद्धी तोंडारे (अक्कमहादेवी), महादेव पार्वती(श्री व सौ गणेश तुपेकर) रथात

विराजमान,महात्मा बसवेश्वरांच्या भुमिकेत अश्वावर विराजमान शरद हिंगमिरे ह्यांच्या सह सर्व कार्यकर्त्यांचे,सदस्य पदाधिकारी सर्वांचे मनापासुन आभार व्यक्त केले तसेच, समाजातील सर्व बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आपल्या एकतेचा, आपुलकीचा आणि सामाजिक बांधिलकीचा जिवंत पुरावा आहे. प्रत्येकाच्या उपस्थितीमुळे या उत्सवाला खरी उंची प्राप्त झाली.

हा उत्सव केवळ एक कार्यक्रम न राहता, तो आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि विचारांचा उत्सव ठरला. *आपण सर्वजण एकत्र आलो, जोडले गेलो आणि समाजभावना अधिक दृढ झाली, हीच या उत्सवाची खरी कमाई आहे. आपले असेच प्रेम, सहकार्य आणि एकजूट कायम राहो, आणि महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रसार अधिक व्यापक होवो, हीच सदिच्छा* या प्रसंगी सर्व श्री प्रशांत शिवणकर, भिमाशंकर चाकोते, रणवीर हाले, निशांत देऊळकर, सुयोग लकडे, समिती अध्यक्ष सुरेश कापसे, अविनाश मुखरे, मोरेश्वर बुट्टेकर, शुभम बारडकर, ज्ञानेश्वर लघंडे, उमेश खापरे,मार्गदर्शक सर्वश्री राजन मुखरे, दिलीपराव खाकरे, अशोक भाऊ वद्राबादे, डॉ गंगाधर पांडे, शिवकांत पांडे मल्लिकार्जूनआरे ,सतीश आजेगावकर, प्रदीप आजेगावकर, सुशील रोहडकर,महिला अध्यक्ष सौ प्रतिभा पांडे, सौ कल्पना कुबडे, सौ शुभांगी खके,सौ दिपाली पांडे,सौ सुरेखा मोगरे,सौ संगीता तोडकर सौ संगीता चाकोते सौ रेखा आजेगावकर सौ राजश्री शिवणकर सौ राणी लकडे सौ मीनल देऊळकर, सौ वर्धा टाले,सौ जयश्री बिडवई,श्रीमती भोगे,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close