विदर्भातील शेतकऱ्यांनी हळदीसह मसाले पीक घेतले तर शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्याची क्षमता!-तुषार वरणगावकर : हळद उत्पादक शेतकऱ्यांशी मुक्त संवाद!

पुसद : हळद ही अत्यंत गुणकारी असून, त्यातील जंतूनाशक गुणधर्मामुळे भारतात प्राचीन काळापासून हळदीचा वापर विविध औषधांमध्ये वापर केला जातो. हळद एकाच वेळी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवते, सुरेख रंग देते यासोबतच त्वचा समस्या कमी करते. यामुळे खाद्य पदार्थांसोबतच सौंदर्य प्रसाधनामध्ये हळदीचा मोठा वापर होतो. त्यामुळेऔषधी गुणधर्मामुळे हळद पिकाला मोठी मागणी आहे. हळद पिकांसह गरगल, मिरची, तीळ, करोळ, जिरे, राई या मसाले पिकांचे चांगले उत्पादन येऊ शकते. परंपरागत शेतीपेक्षा मसाले पिक विदर्भातील शेतकऱ्यांना फायदेशीर आहे, मुख्यत्वे हळद पीक मोठ्या प्रमाणावर घेऊन थोड्या क्षेत्रावर इतर मसाले पिके घ्यावीत, असा मौलिक सल्ला
अमरावती येथील सुप्रसिद्ध घरकुल मसाले ब्रँडचे उद्योजक तुषार वरणगावकर यांनी दिला.पुसदचे उपविभागीय महसूल अधिकारी आशिष बिजवल यांच्या पुढाकारातून पुसद, महागाव तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांची एक बैठक एसडीओ कार्यालयातील सभागृहात बुधवार ता .१५ रोजी पार पडली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना वरणगावकर यांनी हळद पिकाची लागवड, उत्पादन व विक्री या संदर्भात मार्गदर्शन केले. एसडीओ आशिष बिजवल अध्यक्षस्थानी होते. तालुका कृषी अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी विजय मुकाडे, वसंत बायोटेकचे हळद तज्ज्ञ प्रा. गोविंद फुके, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सोनी, प्रा. दिनकर गुल्हाने, प्रगतिशील शेतकरी ओम प्रकाश शिंदे, अभय कदम , शिवराम शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती.वरणगावकर यांनी शेतकऱ्यांना हळदीला योग्य भाव कसा मिळेल, या संदर्भात काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या. हळदीचे वाण साधारणता सेलम जातीचे शेतकरी वापरतात. यात करक्युमिनचे प्रमाण वायगाव पेक्षा अधिक आढळते. अमरावती, वर्धा, यवतमाळ या भागातील हळदीमध्ये हे प्रमाण जास्तीत जास्त ५ टक्के परीक्षणात आढळून आले आहे. मेघालयात हळद पिकवली जाते, परंतु हवामान आणि जमिनीचा पोत यामुळे हे प्रमाण ९% पर्यंत पहावयास मिळते. मसाल्यासाठी ही हळद लांबून खरेदी करावी लागते. मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांनाही उच्च दर्जाची हळद पिकविणे शक्य आहे.कमी खर्चातील, मोजक्या व्यवस्थापनातून हळद पिकातून चांगला नफा मिळू शकतो. यंदा मागील वर्षीची साठवणूक केलेली हळद कमी असून नवीन हळदीला बाजारपेठेत मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे सध्या १४-१५ हजार प्रति क्विंटल एवढे भाव असले तरी पुढे वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारपेठेचा अंदाज घेऊन त्यांच्याकडे साठवणूक क्षमता आहे , असे शेतकरी या गोष्टीचा लाभ घेऊ शकतात.घरकुल तर्फे विनाअडत व विना मध्यस्थ बाजार दराने थेट हळदीची खरेदी करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच वाहन भाडे सुद्धा देण्याचा त्यांनी संकल्प केला. याद्वारे शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
केवळ महाराष्ट्रातच पिकवलेली हळद शिजवण्यात
हळद प्रक्रियेत बदल करा…..
केवळ महाराष्ट्रातच पिकवलेली हळद शिजवण्यात येते व नंतर वाळवून हळकुंडी विक्री केल्या जाते. ही पद्धत खर्चिक आहे. त्याऐवजी ओल्या हळदीला स्वच्छ धुऊन तिचे चिप्स तयार करावेत व चार दिवस वाळविल्यानंतर या हळदीची थेट खरेदी करण्यात येईल, असे तुषार वरणगावकर यांनी स्पष्ट केले. या पद्धतीत कर्क्युमिनचे प्रमाण जास्त राहत असल्याने तसेच वजनातील घट कमी होत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरते त्यामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण बदलेल. हळद चिप्स बनविण्यासाठी यंत्र आमच्याकडे उपलब्ध असून ते यंत्र शेतकऱ्यांना निःशुल्क पुरविण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
पयेते व नं पुसद शहरात आजतर वाळवून हळकुंडी विक्री केल्या जाते. ही पद्धत खर्चिक आहे. त्याऐ..वजी ओल्या हळदीला स्वच्छ धुऊन तिचे चिप्स तयार करावेत व चार दिवस वाळविल्यानंतर या हळदीची थेट खरेदी करण्यात येईल, असे तुषार वरणगावकर यांनी स्पष्ट केले. या पद्धतीत कर्क्युमिनचे प्रमाण जास्त राहत असल्याने तसेच वजनातील घट कमी होत असल्याने शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल व शेतकऱ्याचे अर्थकारण बदलेल हळद चिप्स बनविण्यासाठी यंत्र उपलब्ध असून ते निःशुल्क पुरविण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.



