कु. प्राची विलास पिंपळे ‘जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल पुसदच्या विद्यार्थिनीचे दहावीच्या सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश!

पुसद : यंदा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) बुधवारी, १५ एप्रिलला इयत्ता दहावीच्या मुख्य परीक्षेचा निकाल अधिकृतपणे घोषित केला आहे. यावर्षी निकालाची प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आली असून, नेहमीपेक्षा जवळपास महिनाभर आधीच विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहायला मिळाले आहेत. एकूण शैक्षणिक निकालात वाढ झाली असून यावर्षीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनी मुलांच्या तुलनेत वर्चस्व राखले आहे. या निकालात कु. प्राची विलास पिंपळे ‘जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल पुसदच्या विद्यार्थिनीचे दहावीच्या सीबीएसई परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून तिने दहावीच्या सीबीएसई परीक्षेत९३.६० टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केलं आहे. या यशाबद्दल तिच्यावर सगळीकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रचंड मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि ध्येयाने झपाटून केलेल्या अभ्यासामुळेच तिला हे यश मिळाल्याचं सांगताना आई वडीलाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.प्राचीला ९३.६० टक्के गुण मिळालेले पाहून सुरुवातीला त्यांच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. प्राची या यशाचे श्रेय आई वडील, शिक्षक आणि मित्रांना देत त्यांचे आभार मानले आहेत. लहानपणापासून कमालीची हुशार असलेल्या प्राचीला ९३.६० टक्के गुण मिळाले तरीही तिची अपेक्षा आणखी जास्त गुणाची होती त्यामुळे तिला अश्रू अनावर झाले परंतु पालकांना अपेक्षा होती. यामुळेच पुढे काय करायचे याचे आराखडे त्यांनी काढले होते. तिला पुढील शिक्षण आयआयटी मध्ये करायचे असून ती इंजिनिअरिंगची नागपूर येथे तयारी करीत आहे प्राचीला मिळालेलं हे यश पाहून तिचे आई वडील अतिशय आनंदी झाले आहेत. आईवडिलांनी प्राची बद्दल बोलताना सांगतलं की, आम्ही कधीही प्राचीला अभ्यास कर असे सांगितलंच नाही. तिने या यशासाठी भरपूर मेहनत घेतली. हे सांगताना आपल्याला कु. प्राचीचा अतिशय अभिमान असल्याचे तिच्या आई सौ. संतोषी विलास पिंपळे व वडील विलास पिंपळे यांनी बोलताना व तिचे कौतुक करताना सांगितलं आहे. 
‘जेट किड्स इंटरनॅशनल स्कूल पुसदचे चे जवळपास सर्वच विद्यार्थी विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झाले आहेत हे विशेष. या शाळेने सलग उत्कृष्ट निकालाची परंपरा व नाविन्य पूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात नावलौकिक असलेल्या जेट किड्स स्कुलच्या उत्कृष्ठ निकालामुळे पालक वर्गात यंदा आनंदाचे व समाधानाचे चित्र पहावयास मिळाले. शाळेच्या व्यवस्थापन समितीची शिस्तबद्ध कार्यप्रणाली व प्रदीर्घ अनुभव असलेले प्राध्यापक वृंद ह्यांची सांगड घालून शाळेच्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या प्रचंड परिश्रमाने हे यश संपादन केले असे लक्षात येते जेट किड्स सातत्याने विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण आणि सुसंस्कार देत आहे प्राचार्य श्रीमती के. जी. मीनी कुरूप यांनी सांगितले की शाळा ही केवळ शैक्षणिक सत्रांवर भर देत नाही तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रीत करते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमोल मालपाणी, सचिव डॉ. अस्मिता मालपाणी, प्रा. कडस्कर, प्रा. खर्चे, प्रा. आहाळे, प्रा. वनदेव राठोड, प्रा. डॉ. माधुरी कलकोटे, तुषार सेता, प्रमोद रायपुरकर, सौ. साधना दुबे, बलवंत मोटे, निलेश चव्हाण, सौ. दिपाली टाक व सर्व शिक्षक वृंदानी घवघवीत यश संपादन केलेल्या सर्वच विद्यार्थ्याचे अभिनंदन व भरभरून कौतुक केले आहे.



