ईतर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमगीतांचे सुरेल आणि उत्साहवर्धक कार्यक्रम संपन्न!

पुसद :भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल २०२६ रोजी भीमगीतांचे सुरेल आणि उत्साहवर्धक कार्यक्रम आयोजित केला होता प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती पुसद प्रबोधन पर्व २०२६ यांच्यावतीने गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी गायनाचे व प्रबोधनाचे चार दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पहिले पुष्प दि.१६ एप्रिल २०२६ रोजी राहुल तायडे प्रस्तुत:भीमगर्जना बुद्ध,भीम गीताचा बहारदार आर्केस्ट्रा अमरावती त्यांच्या गीत गायनाने उद्घाटनाला सुरुवात करण्यात आली.

“कष्ट केले त माझ्या भिमाने जाती जाती त वाटू नका रे” अशा बाबासाहेबांच्या जीवनावरील गीत सादर करून स्रोत्याचे व समाज बांधवाचे मन जिंकले.या कार्यक्रमाचे उद्घाटन बुद्धधम्म गुरु भन्ते आर्याजी (बोरी खुर्द) पुसद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.यानंतर विचार मंचावर उपस्थित असलेले आमंत्रित मान्यवर त्यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्वांनी अभिवादन केले. यानंतर सम्राट अशोक महिला मंडळ हर्षी व पारमिता महिला मंडळ महावीर नगर पुसद यांनी संयुक्तपणे बुद्ध वंदना घेऊन पुढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रबोधनपर्व समिती २०२६ चे अध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी आपल्या प्रास्ताविकेत म्हटले की आम्ही सर्व जाती,धर्म,पंथाच्या लोकांना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर १३५ वी जयंती व महात्मा ज्योतिराव फुले यांची १९९ वी जयंती साजरी करत आहो या कामाला सर्व सामाजिक संघटना समाज बांधव तसेच चळवळीतील अनेक मान्यवरांनी आम्हाला सहकार्य केले त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम राबविण्यात यशस्वी झालो तसेच उपस्थित समाज बांधव व विचारमंचावरील मान्यवरांचे आभार सुद्धा व्यक्त करून सर्वांना डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विठ्ठलराव खडसे शिक्षण सभापती न.प.पुसद हे होते. विशेष उपस्थितीमध्ये..डॉ.कल्याण साखरकर, पोलीस निरीक्षक पुसद सेवानंद वानखेडे, प्रा.अनिल काळबांडे ॲड.विश्वास भवरे, इंजिनीयर अन्वर अली अध्यक्ष मिजान अर्बन बिनव्याजी पतसंस्था पुसद, डॉ.प्रशांत वासनिक, राजु दुधे माजी सभापती न.प.पुसद, सुधीर देशमुख प्रदेश कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड, संतोष सुरवाडे राज्य प्रशिक्षक महासचिव बामसेफ, दीपक काळे गटनेता न.प.पुसद, दिलीप कोलेवाड राज्य कार्याध्यक्ष महसूल कर्मचारी संघटना इत्यादी विचारमंचावर उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close