पुसद शहरात आरती ग्यांनचंदानी यांनी रेखाटलेल्या चित्रांचे आकर्षक प्रदर्शन; या भव्य चित्रकला प्रदर्शनातील रंगीबेरंगी चित्रांनी कलाप्रेमींना केले मंत्रमुग्ध!

पुसद : शहरात नुकतेच रेखाटलेल्या भव्य चित्राचे प्रदर्शन पार पडले.चित्रकलेला प्राचीन इतिहास असून ही लिखित भाषेपेक्षाही जुने स्थान आहे. सुमारे ३०,००० वर्षांपूर्वीच्या गुहाचित्रांवरून (पुराश्मयुगीन कला) मानवाने संवादाचे माध्यम म्हणून चित्रकलेचा वापर केला असल्याची माहिती आहे.या जगात असे काही लोक आहेत जे कलेच्या जोरावर अमर झाली आहेत. तर काही चित्रकार आपल्या भोवताली असलेल्या जिवसृष्टीवर आपल्या कलेच्या माध्यमातून आकृती रेखाचित्र रेखाटन करून भाष्य करत जिवंतपणा निर्माण करतात सुंदर चित्र रेखाटणे ही नक्कीच एक उच्च दर्जाची कला आहे. ही कला केवळ पेन्सिल आणि कागदापुरती मर्यादित नसून, ती भावना, कल्पना आणि मानवी आकृतींना कॅनव्हासवर जिवंत करण्याची एक पद्धत आहे.अशाच प्रकरे पुसद शहरातील योगा भवनाच्या दालनात भाजपाचे नेते उद्योजक रवी ग्यांनचंदानी यांच्याा सौभाग्यवती सौ.आरती रवी ग्यांनचंदानी यांच्या चीत्राचे भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन १९ एप्रिल रोजी करण्यात आले. या प्रदर्शनात या चित्रकारांनी कॅनव्हासवर चित्रांचे विविध रंग,विविध भावना व विविध विषयांवर उत्कृष्ट कलाकृती हुबेहूब प्रतिकृती उतरविल्याने हे सर्व चित्रे पाहून नुकत्याच पार पडलेल्या या भव्य चित्रकला प्रदर्शनात रंगीबेरंगी चित्रं पाहून शहरातील व परिसरातील प्रेक्षक अक्षरशः कलाप्रेमींना मंत्रमुग्ध होत भारावून गेले होते.
चित्रकृती नेहमीच रसिकांचे लक्ष वेधून घेतात. चित्रे, रेखाटने नक्कीच एक उच्च दर्जाची कला आहे. चित्रकलेला प्राचीन इतिहास असून ही लिखित भाषेपेक्षाही जुनी कला असुन अत्यंत प्रभावी माध्यम आहे.रंगांच्या मोहक छटांनी सजलेल्या अप्रतिम चित्र कलाकृतींनी रसिकांच्या मनाचा ठाव घेता येतो.
पुसद शहरातील योगा भवनाच्या दालनात सौ.आरती रवी ग्यांनचंदानी यांच्या चीत्र प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन १९ एप्रिल रोजी करण्यात आले. या प्रदर्शनात या चित्रकारांनी कॅनव्हासवर चित्रांचे विविध रंग,विविध भावना व विविध विषयांवर उत्कृष्ट कलाकृती हुबेहूब प्रतिकृती उतरविल्याने हे सर्व चित्रे पाहून नुकत्याच पार पडलेल्या या भव्य चित्रकला प्रदर्शनात रंगीबेरंगी चित्रं पाहाण्यासाठी कलाप्रेमी उत्सुक झाले होते त्यावेळी या चित्र प्रदर्शनातील एकेक कलाकृती उत्सुकतेने बघतांना रसिक आनंदाने मोहरून गेले. कलाकृतींचा सुगंध मनात नेहमी दरवळत राहील, अशा भावना रसिक दर्शकांनी व्यक्त केल्या. 
या भव्य चित्र प्रदर्शनीतील चित्रे आरती रवी ग्यानचंदानी यांनी रेखाटलेली रंगीबेरंगी चित्रं पाहून नागरीकांचा व कलाप्रेमीचा आनंद द्विगुणित झाला त्यामुळे कुंचल्यातून साकारलेल्या कलाकृती पाहून या परीसरात चर्चेचा विषय ठरला या कलाकृतीतून त्यांच्या उत्कृष्ट चित्रकलेचा आस्वाद रसिकांनी घेतला. जवळपास शंभर रंगचित्रांनी रसिकांच्या मनात आस्वादक आनंद भरला.राजकारण, समाजकारण आणि व्यवसाय या पार्श्वभूमीत रमणारे रवी ग्यानचंदानी यांच्या अर्धांगिनी आरती ग्यानचंदानी विज्ञानाच्या शिक्षिका आहेत.
मात्र त्यांना बालपणापासूनच चित्रकलेची आवड होती परंतु अभ्यासासोबत त्या रंग आणि कुंचल्याशी सहजपणे खेळत.कोरोना काळात त्यांनी या आवडीतूनच रंगरेषांच्या अनेक कलाकृती त्यांनी साकारली व कॅनव्हासवर अनेक चित्र चितारली. यातील सारीच चित्रे वॉटर कलर मध्ये रंगवली. त्यांनी काढलेला चित्रांत विषयांची विविधता व वेगवेगळा प्रकार पहावयास मिळाला प्रामुख्याने वारलीचित्र, निसर्ग व व्यक्तिचित्र मोठ्या प्रमाणात आहेत.चित्रकार हा स्वतंत्र वृत्तीचा असतो. त्याच्या कलेत प्रतिभेचा आविष्कार असतो. त्यामुळे त्यांच्या कलाकृतीतून रसिकांच्या मनाला स्पर्श करतो तेव्हा कलावंताच्या आनंदाला पारावार उरत नाही. ही चित्र प्रदर्शनी बघताना रसिकांनी दिलेल्या प्रतिसादाने आरती ग्यानचंदानी भारावून गेल्या. त्या म्हणाल्या, चित्र तयार झाले की पती रवी ग्यानचंदानी यांची पहिली प्रतिक्रिया ऐकताना मन आतुर होते. त्यांच्या प्रोत्साहनामुळे माझ्या चित्रकलेला बळ मिळाले. या चित्र प्रदर्शनीला रसिकांची गर्दी सकाळपासून रात्रीपर्यंत सुरू होती. जवळपास १०० चित्रांची प्रदर्शनी पुसद शहरासह परिसरातील कलाप्रेमी व नागरिकांसाठी डोळ्याचे पारणे फेडणारी ठरली.प्रदर्शनी पाहण्यासाठी विद्यार्थी, महिला,व कला प्रेमींनी हजेरी लावली हे सर्व चित्रे पाहून नुकत्याच पार पडलेल्या या भव्य चित्रकला प्रदर्शनात रंगीबेरंगी चित्रं पाहून शहरातील व परिसरातील प्रेक्षक अक्षरशः कलाप्रेमींना मंत्रमुग्ध होत भारावून गेले.
आरती यांच्या बोटातील कुंचल्यात जादुई : नगराध्यक्ष मोहिनी ताई नाईक
या चित्र प्रदर्शनीचे उद्घाटन नगराध्यक्षा मोहिनी ताई नाईक यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रसिकाग्रणी दीपक आसेगावकर होते.ॲड .आशीष देशमुख, डॉ सतिश चिद्दरवार, शरद मैंद, डॉ संजय जाधव, सुरज डुबेवार, अश्विनी जिल्हेवार, अनघा चक्करवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मोहिनी ताई नाईकांनी चित्र प्रदर्शनीची प्रशंसा केली. त्या म्हणाल्या,कोणतीही कला त्या कलावंताच्या रक्तात भिनलेली असते.ती उजागर करण्यासाठी व्यासपीठ किंवा संधी प्राप्त व्हावी लागते. आरतीताईच्या कुंचल्यात, बोटामध्ये किमया आहे . त्यातून हे सारे चित्र जिवंत झाले आहेत.



