ईतर

कु. नेहा कबले ची कृषी उपसंचालक पदावर निवड झाल्याबद्दल आदिवासी कर्मचारी संघटना, म.रा. (ट्रेड युनियन नोंदणी क्रमांक NGP 5887) यांच्या वतीने सत्कार!

पुसद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन करून कृषी उपसंचालक (Deputy Director of Agriculture) या पदावर निवड झाल्याबद्दल कु. नेहा सुनंदा रामराव कबले हिचा आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य (ट्रेड युनियन नोंदणी क्रमांक NGP 5887) यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.या प्रसंगी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कु. नेहा कबले यांना पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल अभिनंदन व्यक्त करत पुढील शासकीय सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. मेहनत, जिद्द व चिकाटीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन करून समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केल्याचे मान्यवरांनी सांगितले.सत्कार कार्यक्रमास संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये लक्ष्मण टारफे (राज्याध्यक्ष), गजानन बेले (राज्य सहसचिव), गंगाराम काळे (राज्य कार्यकारिणी सदस्य), संजय बुरकुले (राज्य कार्यकारिणी सदस्य), सुखदेव फोपसे (जिल्हाध्यक्ष, यवतमाळ), संजय चिरंगे (कार्याध्यक्ष), पंजाब बेले (तालुकाध्यक्ष, पुसद), अनिल दुम्हारे (सचिव), रामप्रसाद उघडे (उपाध्यक्ष) तसेच सदस्य चंद्रकांत माळघणे, संजय मोरे, गजानन वंजारे, चंद्रकांत डहाके, सदाशिव आमले, नितीन तायवाडे, तुकाराम धनवे, गजानन वाडगे, रवी रणमले आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close