क्राइम

भारत फायनान्स कंपनीतील जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस: फिर्यादीच निघाला चोर!

लुटल्याचा बनाव केल्याचे चौकशीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडुन उघड; एकूण १,५५,३५०/- रु.चा मुददेमाल जप्त!

पुसद: येथील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दि.२४डींसेबर२०२४ रोजी १६/३० वाजता भोजला टी पॉईट हनुमान मंदीरा समोर वालतुर कडे जाणा-या रस्त्यावर फिर्यादी निलेश नागेश पुरी वय १९ वर्ष, रा. अनंतवाडी ता. महागांव जि. यवतमाळ हेत्याची नवीन मोटार सायकल एचपी डिलक्स ही वरुन जात असतांना दोन अज्ञात इसमांनी विना क्रमांकच्या मोटार सायकलवर येवून फिर्यादीच्या मोटार सायकलला लाथ मारुन फिर्यादीस खाली पाडून त्याच्याकडील काळी बॅग व त्यामध्ये असलेले भारत फायनान्स कंपनीची जमा रोख रक्कम ६६०००/- रु., सैमसंग १८०००/-कंपनीचा जुना वापरता टैब कि रु, जुना वापरता बायोमॅट्रीक कि ५४००/- रु असा एकूण८९४०० रु मुद्देमाल जबरी चोरी करुन भोजला बाजूकडे पळून गेले म्हणून वसंतनगर पोलीस स्टेशन अप क्रमांक ६००/२०२४ कलम३०९(६), ३(५) भांदवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. फिर्यादीत चोर निघाल्याने खळबळ उडाली आहे.सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहता व यापुर्वी झालेले भारत फायनान्सचे जबरी चोरीचे गुन्हे पाहता मा. वरिष्ठ अधिकारी यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणणे कामी स्थागुशा पथकाला आदेशित केले होते. त्याप्रमाणे स्थागुशा पथकांने सदर गुन्हयाचे फिर्यादीची घटनेच्या दिवसांची संपूर्ण मुव्हमेंट समजावून घेवून त्याप्रमाणे संपूर्ण रुटचे दिवस भरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाई पाहणी करता तसेच गुन्हयाचे तांत्रीक विश्लेषन करता फिर्यादीचे खबरेमधील हकिगत मध्ये तफावत दिसून येत असल्याचे निष्पन्न झाल्याने फिर्यादीकडे पोलीस कौशल्याचा वापर करुन आणखी सखोल तपास करता यांतील साक्षीदार यांचे नाव समोर आल्याने साक्षीदार यांच्याकडे फिर्यादी यांने ठेवण्याकरीता दिलेली बंग पंचा समक्ष जप्त करून तिची पाहणी करता त्यामध्ये गुन्हयातील रोख रक्कम रोख रक्कम६१९५० रु, सॅमसंग कंपनीचा जुना वापरता टॅब किं १८०००/- रु, जुना वापरता बायोमेट्रीक कि ५४००/- रु असा एकूण८९४००/- रु मुददेमाल पंचा समक्ष जप्त केला तसेच फिर्यादीचे विवो कंपनीचा मोबाईल किंमत१००००/- रु, फिर्यादीची नवीन एचपी डिलक्स मोटार सायकल किंमत६००००/- रु असा एकूण १५५३५०/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन यांतील फिर्यादीने स्वतःच्या आर्थीक फायदयासाठी केलेला जबरी चोरीचा बनाव स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकांने अतिशय कौशल्यपुर्णरितीने उघडकीस आणून मुद्देमाल व फिर्यादी/आरोपी निलेश नागेश पुरी वय १९ वर्ष, रा. अनंतवाडी ता.महागांव जि. यवतमाळ यास अटक करून पुढील कारवाई कामी वसंतनगर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता सा, मा अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री पियुष जगताप सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति पोलीस अधीक्षक श्री चुलुमुला रजनिकांत सा, मा. पोलीस निरीक्षक श्री ज्ञानोबा देवकते, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोहचा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोहवा/कुणाल मुंडोकार, पोशि सुनिल पंडागळे, सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close