दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोराचा डाव स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने उधळला!
आरोपींकडून चोरीचे २९ गुन्हे उघडकीस घातक शस्त्रासह एकूण ११,६१,९५०/रू.चा मुद्देमाल जप्त!

पुसद :पोलीस उपविभागामाध्ये ९ डिसेंबर २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे पथक मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा ज्ञानोबा देवकाते यांचे आदेशाने १.४५ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत असताना खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील वाशीम पुसद रोडवरील ग्राम आडगाव फाटा येथे दोन चार चाकी गाड्या त्यामध्ये कार व एक बोलेरो पिकअप रोडचे साईडला अंधारामध्ये उभी करून त्याचे बाजूला अंधारात ५ ते ६ इसम दरोडया सारखा गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत संशयितरित्या उभे आसल्याचे दिसल्याने स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कडील खालील पथकाने त्यांना सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जात आसतांना अतिशय कौशल्यपुर्ण रितीने त्यांना ताब्यात घेतले त्यांची नावे १) शेख महमद शेख अफसर उर्फ बबलू वय. ४० वर्ष, रा.पातुर जि.आकोला, २) जावेद खान बरकत खान वय ४४ वर्ष, रा.कंजारा ता. खामगाव जि. बुलढाणा, ३) किशोर सुकलाल लहाणे वय.२७ वर्ष, रा.अमडापुर ता. चिखली जि. बुलढाणा, ४) सागर अशोक वानखेडे वय.२८ वर्ष, रा.अमडापूर ता. चिखली जि. बुलढाणा, ५) शेख जमील शेख सलीम वय.२५ वर्ष, रा. कंजारा ता. खामगाव जि. बुलढाणा, ६) सय्यद शाबीर सय्यद सुलेमान वय. ५१ वर्ष, रा.सिरजगाव देशमुख ता. खामगाव जि. बुलढाणा असी असुन त्यांचेकडील सिल्वर रंगाची टाटा इंडिगो क.एम.एच. २३/वाय ४८४८ हीची व पांढ-या रंगाची महींद्रा बोलेरी कमांक एम. एच.३०/ओबी २६८२ हीची पाहणी करता सदर दोन्ही वाहनांमध्ये एक धारदार चाकू, एक धारदार कोयता, दोन पेचकस, दोन पकड, एल लोखंडी टामी, एक बॅटरी, एक लोखंडी हातोडा, एक नायलॉन रस्सी, असे दरोडयासाठी आवश्यक असलेले साहीत्य मिळून आले. त्यावरून पो.हवा. १८६७ कुणाल मुंडीकार स्था. गु. शाखा यवतमाळयांचे फिर्यादीवरून खंडाळा पोलीस स्टेशन अप.क.४९१/२०२४ कलम ३१०(४) बी.एन.एस. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर गुन्हयाचा तपास सुरू असतांना सदर आरोपींचे रेकॉर्ड तपासता त्यांचेवर यापुर्वी इलेक्टीक अॅल्युमिनीयम तार चोरीचे व इतर १२ गुन्हे दाखल असुन सदरचे आरोपी हे सराईत आसल्याचे समोर आल्याने त्या दृष्टीने आरोपींकडे तपास करता आरोपींनी सन २०२३ व २०२४ मध्ये यवतमाळ जिल्हयात खालील प्रमाणे एकूण २९ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याबाबत त्याचेकडे विचारपूस करता त्याने खालील गुन्हयातील चोरलेल्या मालापैकी काही माल त्यांचेकडील पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच.३०/बी.डी.३४६९ मध्ये लपून ठेवल्याचे सांगितल्याने त्याप्रमाणे पंचनामा करून सदरचा चोरीचा माल त्यामध्ये ४५,२००/- रू.कि.च्या अॅल्युमिनीयच्या ताराचे एकूण १६ गठठे वजन एकूण ४५२ किलो तसेच इलेक्ट्रीक लोखंडी वजन काटा ५०००/- रू.कि.चा जप्त करून ताब्यात घेण्यात आला आहे. अशा प्रकारे सदर पथकाने आरोपींना दरोडया सारखा गंभीर गुन्हा करण्यापासून रोखून आरोपींकडून एकूण ११,६१,९५०/- रू.चा मुद्देमाल जप्त करून एकूण २९ गुन्हे उघडकीस आणून प्रशंसनीय कामगिरी केली असुन सदर आरोपी पुढील कार्यवाही करीता खंडाळा पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहेत. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनी पाटील खंडाळा पोलीस स्टेशन करीत आहेत.
यवतमाळ जिल्ह्यातील उघडकीस आलेले एकूण २९ गुन्हे इलेक्टीक ॲल्युमिनीयम तार चोरीचे गुन्हे खालील प्रमाणे.अनु क्रमांक पोलीस स्टेशन व अप क्रमांक व कलम १)पुसद शहर २४७/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा-जप्त मुददेमाल-१०० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२).पुसद शहर ३८३/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा,जप्त मुददेमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,३).पुसद शहर ७३६/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,४)पुसद शहर ४२३/२०२४ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा,१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,५)पुसद शहर ५८२/२०२४ कलम ३७९ भादवि १५० मिटर ॲल्यूमिनीयम तार ६)पुसद ग्रामीण ४३५/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल १५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,७)पुसद ग्रामीण ४५९/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा,१०० मिटर ॲल्यूमिनीयम तार ८)पुसद ग्रामीण ५०३/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा,१०० मिटर ॲल्युमिनीयम तार९)पुसद ग्रामीण ५३१/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा,१०० मिटर ॲल्युमिनीयम तार १०)पुसद ग्रामीण ५२७/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,११)पुसद ग्रामीण ७०९/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा,जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,१२)पुसद ग्रामीण ६८९/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा,जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार १३)खंडाळा ४२२/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,१४खंडाळा ४३३/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,१५)पोफाळी १२०/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-१०० मिटर ॲल्यूमिनीयम तार, १६)पोफाळी १२१/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,१७)पोफाळी १३९/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार, १८)पोफाळी १८४/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,१९)पोफाळी २६१/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार, २०)पोफाळी ३५०/२०२४ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२१)महागांव ५४०/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२२)महागांव ७१०/२०२४ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२३)महागांव ५१४/२०२४ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२४)नेर ६१५/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२५)नेर ६१०/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२६)नेर ३३५/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२७)नेर ३३६/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा, जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२८)नेर ४९२/२०२४ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा जप्त मुद्देमाल-६० मिटर ॲल्यूमिनीयम तार,२९.)दिग्रस ५९५/२०२३ कलम १३६ भारतीय विद्युत कायदा , जप्त मुद्देमाल-१५० मिटर ॲल्यूमिनीयम तार,असा सेवा एकूण जप्त मुद्देमाल-३२०० मिटर ॲल्यूमिनीयम तार,सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ मा. कुमार चिंता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अति. पोलीस अधिक्षक श्री. रजनिकांत चिलुमूला सा, मा. पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकाते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मर्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, चाउपनि रविंद श्रीरामे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुडोकार, पोहवा रमेश जाधव, पोशि सुनिल पंडागळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ व सपोनि देवीदास पाटील, पोहवा सलीम शेख, पोहवा अखिल चव्हाण सर्व खंडाळा पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे



