को.दौ.विद्यालयाच्या मुख्याध्यापक प्रकरणी उच्च न्यायालयाचा शिक्षणाधिकारी व संस्था चालकास दणका ;मुख्याध्यापकपदी गजानन वायकुळे पून्हा रूजू !

पुसद: यवतमाळ जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मोठ्यात मोठ्या शाळांपैकी व सुमारे एकशे दहा वर्ष जुन्या असलेल्या नामांकित पुसद मधील कोषटवार दौलत खान विद्यालय व गोदाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालय येथे संस्थाचालकांच्या वादामुळे मागील सुमारे मागील सहा महिन्यांपासून मुख्याध्यापक पदाचा वाद असून संस्था चालकांनी सर्व नियम बाजूला सारून स्वताचीअरेरावी करीत गजानन वायकुळे यांना मुख्याध्यापक पदावरून पदावरून काढून रीता बघेल यांना मुख्याध्यापक पदावर बसविले होते.गजानन वायकुळे यांना मुख्याध्यापक पदावरून पदावनत केल्यानंतर त्यांनी शाळा न्यायाधिकरण अमरावती येथे धाव घेतली.शाळा न्यायाधिकरण यांनी गजानन वायकुळे यांच्या बाजूने संस्था चालकांच्या आदेशाला स्थगिती देत पुढील आदेशापर्यंत गजानन वायकुळे हेच मुख्याध्यापकपदी कायम राहतील असा आदेश दिला. परंतु शाळा न्यायाधिकरण येथे प्रकरण चालू असतानाच काही दिवसातच संस्था चालकांनी वेगळीच शक्कल लढवून को.दौ.शाळेतील उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक..,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापक गजानन वायकुळे यांना मुख्याध्यापक पदावरून पाय उतार करून शिक्षणाधिकाऱ्याकडे तसा प्रस्ताव पाठवीत रिता बघेल यांना मुख्याध्यापक पदी रुजू केले. या आदेशाविरुद्ध नागपूर उच्च न्यायालयात गजानन वायकुळे यांनी न्यायालयाच्या अवमान प्रकरणी संस्थाचालक व शिक्षणाधिकारी यवतमाळ यांच्याविरुद्ध अपील दाखल केले. त्यामुळे शिक्षणाधिकारी यवतमाळ यांनी दि. २८ नोव्हेंबर रोजी तातडीचे आदेश काढीत रिता बघेल यांना मुख्याध्यापक पदाचा आदेश रद्द करीत गजानन वायकुळे हेच शाळा न्यायाधिकरण अमरावती यांच्या आदेश येईपर्यंत मुख्याध्यापक पदावर कायम राहतील अशा प्रकारचे आदेश संस्थाचालकास दि.१८ नोव्हेंबर रोजी बजावले आहे. परंतु हे आदेश बजावून चार-पाच दिवस उलटले असतानाही संस्थाचालक त्यांनी स्वतःची अरेरावी करत अद्यापही गजानन वायकुळे यांना मुख्याध्यापक पद बहाल केले नसून तूर्तास तरी त्यांनी उच्च न्यायालय व शिक्षणाधिकारी यांच्या पत्राला केराची टोपली दाखविलेली आहे.संस्थाचालकाच्या वादामध्ये एकशे दहा वर्ष दिल्या या नामांकित शाळेला अखेरची घरघर लागली असून तूर्तास संस्थेला दोन अध्यक्ष असून शिक्षकांची २५ ते ३० पदे रिक्त असून भरलेल्या सात शिक्षकांना मागील तीन वर्षांपासून वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली असून पदे न भरल्याने विद्यार्थ्यांचे सुद्धा प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.शासनाकडून राज्यात अनेक विभागातील पदे रिक्त असल्याने बेकारांची संख्या वाढली असतानाच पुसद मधील को.दौ. विद्यालयात सन २०२१ मध्ये शासनाकडून पोर्टल वरील सोळा जागा भरण्यासाठी शिक्षक पाठविण्यात आले होते परंतु सात गटातील प्रत्येकी एक शिक्षकाची नियुक्ती करणे अनिवार्य असताना संस्था चालकांनी सहा गटातूनच सात शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या व बाकी गटातील जागा रिक्त ठेवल्याने संस्थेने नियमाचे पालन न केल्यामुळे शिक्षणाधिकारी यवतमाळ यांनी नियुक्त केलेल्या त्या शिक्षकांची मागील तीन वर्षांपासून पदमान्यता न दिल्याने त्या शिक्षकांना वेतनापासून वंचित रहावे लागत असल्याने उपासमारीची पाळी त्यांच्यावर ओढवली आहे. नियमानुसार जागा न भरल्यामुळे पुढील पोर्टलवरून शासनाने या शाळेचे नाव सुद्धा काढून टाकल्याने या शाळेत सुमारे २५ ते २६ जागा रिक्त असल्याने सुमारे तीन ते साडेतीन हजार विद्यार्थी संख्या असलेल्या या शाळेत प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालक वर्गात तीव्र असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. आजमीतीस संस्थाचालकाच्या वादांमुळे या संस्थेस दोन अध्यक्ष झाले असून सद्यस्थितीत संस्थेने मुख्याध्यापकाच्या वादात न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका तूर्तास मुख्याध्यापक गजानन रंगराव वायकुळे यांनी न्यायालयात दाखल केली असून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे सद्यस्थितीत शिक्षणाधिकारी व संस्थाचालक यांना उच्च न्यायालयाने चपराक दिल्याने शिक्षण अधिकारी यवतमाळ यांनी गजानन वायकुळे यांनाच मुख्याध्यापक पदी रुजू करण्याचे संस्थेला आदेश दिलेले आहेत



