चिमुरडीवरील अत्याचार व हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्या; आदिवासी कर्मचारी संघटनेची मागणी

पुसद : वर्धा जिल्ह्यातील सावंगी (रोठा) येथे बारा वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्या प्रकरणाचा आदिवासी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ट्रेड युनियन नोंदणी क्र. NGP 5887 यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोरात कठोर कारवाई करून कायद्यानुसार फाशीची शिक्षा देण्यात यावी आणि सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून तातडीने न्याय देण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.याबाबतचे निवेदन मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना मा. उपविभागीय अधिकारी, पुसद यांच्यामार्फत सादर करण्यात आले. प्रकरणातील इतर आरोपींचा सहभाग असल्यास त्याची सखोल चौकशी करून त्यांना तात्काळ अटक करावी, वरिष्ठ विशेष सरकारी वकील नियुक्त करावा आणि पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत, पुनर्वसन व कायदेशीर सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.या अमानुष घटनेमुळे समाजामध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून, शासन व प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि पीडित कुटुंबाला जलदगतीने न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली.निवेदन सादर करतेवेळी आदिवासी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष लक्ष्मण टारफे, . गणपत गव्हाळे, (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद), देविदास डाखोरे, (जिल्हाध्यक्ष, भारतीय आदिवासी पॅंथर संघटना,) नानासाहेब बेले( विदर्भ सचिव बिरसा ब्रिगेड), मधुकर मोरझडे, संदीप आढाव, पंजाब बेले, अनिल दुम्हारे , राजेश घुक्से, परमेश्वर मोरे, दिनेश खेकाळे, संजय चिरंगे, भगवान भोरकडे,संतोष डाखोरे, उद्धव धोंगडे, विश्वनाथ रणमले, दादाराव टारफे, पुंजाराम इंगळे, देवराव मुरमुरे, पवन सातपुते, बाबुराव बोंबले, पांडुरंग ठाकरे, संजय भिसे, साहेबराव मार्कड, गजानन वंजारे, गणेश फोपसे, प्रदीप घावस, पंकज वंजारे, सचिन आत्राम, संजय व्यवहारे आदी उपस्थित होते.



