राजकिय

पुसद विधानसभा मतदारसंघात ॲड इंद्रनील नाईक यांनी विजयाचा गुलाल उधळला: तर राज्यात निवडणुकीचे अनाकलनीय निकाल..

पुसद : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० तारखेला मतदान झालं आज मतमोजणी झाली. राज्यातील मतदारांनी पुन्हा महायुतीलाच कौल दिला असून महायुतीचा दणदणीत विजय झाला आहे. भारतीय जनता पक्ष हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर महाविकास आघाडीचं अक्षरश: पानिपत झालं असून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.पुसद मतदारसंघात गेल्या एक महिन्यांपासून राजकीय वर्तुळात वातावरण तापल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. महाविकास आघाडी व महायुती यांच्यात थेट झालेल्या लढतीमध्ये कोण जिंकून येणार? कुणाची पीछेहाट होणार? यावरून मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. विशेषत: सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंना राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील विभक्त झालेले गट असल्यामुळे यावेळच्या निकालांबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. आता अंतिम निकाल समोर आल्याने पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार इंद्रनील नाईक यांनी १२७९६४ मते घेतली तर महाविकास आघाडीचे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार शरद मैंद यांना ३७१९५ दुसऱ्या क्रमांकाचे मते मिळाली तर तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन पक्षाचे अधिकृत उमेदवार माधवराव रुखमाजी वैद्य यांना३६५७५ मते मिळाली. तर इतर पक्षाचे व अपक्ष १०ही उमेदवार आपले डिपॉझिट वाचू शकले नाही तर माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचा ५०.०००चा विक्रम त्यांच्याच पुत्राने मोडीत काढला, आणि या मतदारसंघात १९५२ पासून नाईक घराण्याची विजयाची परंपरा जनतेने ही निवडणूक हातात घेतल्याने ही परंपरा कायम राखली तर मतदार संघातील जनतेने भरभरून प्रेम दिल्याने इंद्रनील नाईक हे पहिल्या फेरी पासून तर २४ व्या फेरीपर्यंत आघाडीवर असल्याने ते ९१७६९ भरघोस मताने विजय झाले आहेत. विजयाचा गुलाल उधळण्यासाठी माहितीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी तसेच इंद्रनील नाईक यांच्या समर्थकाांनी एकच गर्दी केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close