श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा अभिनव उपक्रम;सिडबॉल उपक्रम पर्यावरण संवर्धनाची नांदी ठरेल- माजी आमदार ॲड.निलय नाईक

पुसद : श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद व गुरुकुल इंग्लिश स्कूल पुसद यांच्या वतीने २२ जुलै २०२६ रोजी भव्य वृक्षारोपण व सीडबॉल हस्तांतरण समारंभ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ॲड. निलय नाईक तर विशेष अतिथी म्हणून अमितकुमार मिश्रा वन संरक्षक अधिकारी पुसद, पद्मभूषण राजगुरू, भाजपा पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, नगरपरिषद उपाध्यक्ष अर्चना जगताप यांच्या समवेत श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर, सचिव अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर, निळकंठ पाटील, डॉ साहेबराव चौधरी, सुधाकर ठाकरे, दीपक काळे, निखिल चिद्दरवार, निलेश पेन्शनवार, अश्विनी जिल्हेवार, प्राचार्य दत्तात्रय जीवने, प्राचार्य अमित ठाकूर विचारपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, स्व.देवराव पाटील चोंढीकर व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मान्यवरांच्या स्वागतानंतर श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसदच्या सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर यांच्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेले २०२०० सीड बॉल वनसंरक्षक अधिकारी यांच्या मार्फत शासनाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून हस्तांतरित करण्यात आले. अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी प्रास्ताविकातून पर्यावरण संरक्षणामध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा खारीचा वाटा निर्माण व्हावा या उद्देशाने सीडबॉल हा उपक्रम राबविला आहे आणि भविष्यातही पर्यावरणासाठी संस्थेच्या वतीने भरीव कार्य केले जाईल असे त्यांनी नमूद केले. त्यानंतर विद्यालयातून सर्वाधिक सीडबॉल तयार करणारे सुमित पतंगे, आरुषी रहाटे, खुशी ढोले, चैताली कोरडे, वैष्णवी दोडके, पूजा वाघमारे, प्राजक्ता महाळनकर गुरुकुल इंग्लीश स्कूलच्या सृष्टी जाधव व समृद्धी जाधव या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते कौतुक करण्यात आले.
सीडबॉल उपक्रमातून पुसदकर स्वच्छ श्वास घेतील-अमितकुमार मिश्रा
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वनसंरक्षक अधिकारी अमितकुमार मिश्रा यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे या अभिनव उपक्रमाबद्दल मनापासून कौतुक केले व या सीडबॉलच्या रूपातून भविष्यात तयार होणाऱ्या झाडांमधून पुसदकर स्वच्छ श्वास घेतील असा विश्वास व्यक्त केला . 
याप्रसंगी पद्मभूषण राजगुरू व डॉ. आरती फुफाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात ॲड. निलय नाईक यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था शालेय उपक्रमा बरोबर नेहमीच विविध प्रकारचे सहशालेय व सामाजिक उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबवित असल्याचे सांगितले. त्यापैकीच आज विद्यार्थ्यांनी आपल्या सुट्टीच्या वेळेत पर्यावरणाला साथ देण्यासाठी तयार केलेला सीडबॉल उपक्रम कौतुकास पात्र असून हा सीडबॉल उपक्रम भविष्यात पर्यावरण संवर्धनाची नांदी ठरेल असे मत व्यक्त केले. या प्रसंगी पंजाब भोयर प्रतीक पाटील,मनोज ठाकरे, देवराव जाधव,राजेंद्र जगताप रुपेश जाधव, रोहन आडे, श्याम जोशी, सुधाकर चव्हाण,गजानन हिंगमिरे अनिल पांडे, ओमप्रकाश शिंदे, विक्रांत जिल्हेवार, साहेबराव ढगे, श्रीधर गरड,सुधाकर कांबळे, शरद राठोड, सुरज कुरील महेश काळे,सुरेश तिवारी, राजेश दळवी, नारायण गायकवाड, प्रणव भागवत कार्यक्रम साठी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन जाधव यांनी तर आभार प्रदर्शन सुधाकरराव ठाकरे यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.



