ईतर

माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्या वतीने सामान्य परिस्थितील होतकरूं विद्यार्थ्यांच्या गुणगौरव!

पुसद:विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिकरीत्याच गुणवत्तेचे बीज लपलेले असते.पण उत्तम अध्यापनाबरोबरच पोषक शैक्षणिक वातावरणही त्याच्या विकासासाठी आवश्यक असतात.पण सामान्य कष्टकरी कुटुंबातील मुलांना ह्या दोन्ही बाबी कदाचितच मिळतात.श्रिमंताची मुलं महागड्या क्लासेसच्या भरवशावर गुणवत्ता संपादन करतात.तर दुसऱ्या बाजुने कुटुंबातील सर्व जबाबदाऱ्या पेलत सामान्य परीस्थितील मुलं अपार कष्टाच्या बळावर यश संपादन करतात.

तालुक्यातील अशाच सामान्य परीस्थितीतील गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना माणुसकीची भिंत तर्फे मागील सहा वर्षापासून सन्मान चिन्ह देऊन मार्गदर्शन करून कौतुक केले जाते. यावर्षीही दिनांक ३०जुलै २०२३ रविवार रोजी लक्ष्मी मंगल कार्यालय वाशिम रोड लिंबी तब्बल पन्नास विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह ,एक बॅग व झाडाचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला यावेळेस उपस्थित मान्यवर DYSP श्री पंकज अतुलकर पुसद, अर्बन बँकेचे कुशल अध्यक्ष श्री शरदभाऊ मैंद, बाबासाहेब नाईक इंजिनीयर कॉलेजचे प्राचार्य वानखेडे देशोन्नती तालुका प्रतिनिधी माननीय ललित भाऊ शेता शेतीनिष्ठ शेतकरी दत्तात्रय जाधव,उद्गगम फाउंडेशनच्या सचिव सौ. सोनलताई नाईक,ग्रँड मराठा फाउंडेशनचे नवीन आडे, भिम टायगर सेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री किशोर कांबळे,मराठा सेवा संघाचे पुसद तालुकाध्यक्ष श्री प्रभाकर टेटर, सौ.आशाताई कदम या
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन कौतुक करण्यात आले. शिवप्रभा चारीटेबल ट्रस्ट पुणे व ग्रँड मराठा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजवंत वीस विद्यार्थ्यांना शालेय किटचेही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.सोबतच भविष्यातील करीअरच्या विविध वाटा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या गौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दत्तात्रेय जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून संचलनाची जबाबदारी परशुराम नरवाडे यांनी पार पाडली तर आभार पंकजपाल महाराज यांनी मानले.अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याला पालकांची व विद्यार्थ्यांची उस्फुर्त गर्दी होती.सामान्यांच्या लेकरांसाठी उचललेल्या माणुसकीची भिंत फाऊंडेशनच्या प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमाच्या यशस्वीते करता माणुसकीची भिंत अध्यक्ष गजानन जाधव, उपाध्यक्ष संतोष गावंडे, सचिव सोहम नरवाडे, सदस्य पंजाब ढेकळे, शिवराम शेट्टे, प्रभाकर पाटील,अनंता चतुर, अरुण नागुळकर,सुनील ठाकरे सर,विजय राठोड, प्रेमदास पवार, अशोक सावंत, गणेश सावंत, शांतीसागर इंगोले व महिला सदस्या मोनिका जाधव, रेखा आगलावे, अर्चना गावंडे, प्रियंका बेले ,पूजा इंगोले,अलका आगाम, शीला वाकोडे, शांताबाई जाधव व धनंजय आगाम, दीपक घाडगे,अवधूत मस्के,संतोष जाधव, शुभम जाधव,दिनेश राठोड, ऋषिकेश जोगदंड, पृथ्वीराज चव्हाण, मोहन नागपूरकर, विलासर जाधव सर व लिंबी येथील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close