ईतर

जामबाजार आणि बोरी महसूल मंडळात अवैध मुरूम उपसा कणाऱ्याचा धुमाकूळ; कुंपणच शेत खात असल्याचा संशय!

पुसद : तालुक्यात जाम बाजार आणि बोरी महसूल मंडळातील परिसरात दररोज बेकायदा आणि बेसुमार मुरूम उपसा चालू असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असतानाही संबंधित महसूल विभागाची यंत्रणा मंडळाधिकारी, तलाठी याकडे जाणूनबुजून “अर्थ’ पूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा सध्या नागरिकांतून सुरू आहे.तर या अवैध मुरूम उपसाला महसूल विभागाचे संबंधित तहसीलदार खनिजकर्म शाखेचे अधिकाऱ्यांनी मूक संमती दिली की काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. तर मुरूम माफिया महसूल विभागाच्या खनिजकर्म शाखेकडून कमी ब्रास ची रॉयल्टी काढून हजारो ब्रास मुरुमाचा उपसा करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यामुळे या मुरूम माफियांनी अवैधरित्या उत्खनन केलेल्या खदानीतील खोदकामाचे कंटुर मॉपने मोजमाप करून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित या मुरूम उपसा करणाऱ्या मुरूम माफियांवर शासनाचा कोट्यावधीचा महसूल बुडविल्या प्रकरणी त्यांच्यावर पाचपट दंड आकारून ज्यांच्या मालकीच्या शेत सर्वे नंबर मधून मुरूम उपसा केला त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढविण्यात यावा अशी मागणी तक्रारकर्त्याच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर ना. बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याने कुंपणच शेत खात असल्याचा संशय बळावला आहे.

याबाबत ‘झेप न्यूज ला’सूत्रांकडून प्राप्त माहिती अशी की,सध्या पुसद तालुक्यातील जामबाजार आणि बोरी महसूल मंडळातील परिसरात महसूल विभागाच्या खनिजकर्म शाखेकडून काही मुरुम माफिया शेतीच्या नावाखाली नाममात्र रॉयल्टी काढून हजारो ब्रास मुरुमाचा बेकायदा उपसा करीत आहेत. त्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. शहरासह ग्रामीण भागात लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे.लोकांना रोजगाराच्या व चांगल्या सुविधांच्या शोधात शहरांकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे शहराच्या हद्द मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने अनेक बिल्डर आणि डेव्हलपर्सनी  प्लॉट ले-आउटची निर्मिती ठिकठिकाणी सुरू केल्याने नवीन घराचे, दुकाने मॉल, बांधकामे,रस्ते दुरुस्तीचे कामे युद्धपातळीवर सुरू आहे. या बांधकामासाठी तसेच रस्त्यांच्या कामासाठी लागणारे गौणखणीजासाठी काही मुरूम माफिया शहरालगतच्या खाजगी किंवा शासकीय भूखंडावर डोळा ठेवून गौण खनिजांच्या उत्खननासाठी आतुर झाले असून या अवैध गौण खनिजांच्या धंद्यांतुन महसूल प्रशासनाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यासोबत संगनमत करून शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत आहेत. याच पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या जामबाजार मंडळातील कवडीपूर आणि बोरी मंडळातील वडसद परिसरातील शेतीचे उत्खनन करण्याच्या नावावर माती-मुरूमची बेकायदेशीररित्या तस्करी बिनधास्त सुरू आहे. राजरोसपणे जेसीबी, पोकलेन मशीनच्या साहाय्याने नियमापेक्षाही जास्त जमीन खोदून मुरूम लंपास केला जातो. हा सगळा प्रकार इतका सराईतपणे होत आहे की, कुणालाच कायद्याची किंवा कारवाईची भीती वाटत नाही.कमी ब्रासची रॉयल्टी काढून जास्त ब्रास मुरूम काढणे किंवा शेकडो ब्रास रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास मुरूम काढण्याच्या अनुचित प्रकाराने शासनाला लाखो रुपयांचा चुना लावला जात आहे.नाममात्र रॉयल्टी व वाहतूक परवाना मिळवून हजारो ब्रास मुरुम खोदुन नेला जात आहे. काही दिवसांपूर्वी तर, १०० ब्रास मुरुमाची रॉयल्टी काढून हजारहून अधिक ब्रास मुरुम खोदून नेण्यात आला. विशेष म्हणजे दोन किंवा तीन गाड्यांना वाहतूक परवाना असताना दहा ते पंधरा गाड्या मुरुम वाहतुकीसाठी वापरल्या जातात. यातून हजारो ब्रास मुरुमाची चोरी केली जाते. मुरुमाची रॉयल्टी भरुन वाहतूक पास काढली जाते. ठराविक वेळ व दिवसासाठी ही पास असते. परंतु विविध कारणे देऊन याचा कालावधी वाढवून घेतला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल दिवस-रात्र सुरू असल्याचे आढळले आहे. अनेक वाहने ओव्हरलोड स्थितीत सुसाट धावत असल्याने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. काही वाहनांवर क्रमांकफलक नसल्यामुळे अपघात झाल्यास संबंधित वाहन ओळखणे कठीण होत असते हे अवैध उत्खनन केवळ शासनाचे आर्थिक नुकसानच करीत नाही तर ते या निसर्गावर सुद्धा मोठा आघात करीत आहेत. या भागांत रात्रीच्या अंधारात आणि दिवसाढवळ्या नैसर्गिक डोंगरांचे अवैध पद्धतीने लचके तोडले जात आहेत. यामुळे बेसुमार माती व दगड उपशामुळे डोंगर टेकड्या कमकुवत होत असताना या परीसरात भविष्यात भूस्खलना सारख्या दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली आहे.त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास करून आड-जातीच्या वृक्षाची कत्तल करून काही मुरूम माफिया स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अशा खदानीतुन मुरूमाचे अवैधरित्या उत्खनन करीत असल्याने निसर्गाची उघड उघड लूट करीत आहेत.हे बेकायदा मुरूम उपसा होत असताना पुसद महसूल विभागातील मंडळ अधिकारी तलाठी यांचेही जाणीवपूर्वक अर्थ’पूर्ण’ दुर्लक्ष आहे, असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करून घटनास्थळी भेट देऊन स्पॉट पंचनामा करावा तसेच नियमबाह्य जर उत्खनन असल्यास संबंधितांवर अवैधरित्या उत्खनन केलेल्या खदानीतील खोदकामाचे कंटूर मॉपने मोजमाप करून अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन केल्याप्रकरणी संबंधित या मुरूम उपसा करणाऱ्यांवर मुरूम माफियांवर शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडविल्या प्रकरणी त्यांच्यावर पाचपट दंड आकारून ज्यांच्या मालकीच्या शेत सर्वे नंबर मधून मुरूम उपसा केला त्यांच मालमत्तेवर बोजाचढविण्यात यावा तसेच मुरूमाची अवैधरित्या उत्खनन करून डंपर, ट्रक,जेसीबी, ट्रॅक्टर, व पोकलेन मशीनच्या साह्याने ओव्हरलोड वाहतूक केल्या जात असल्याने  चालक, मालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी तक्रारकर्त्याच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे करण्यात आल्याने कुंपणच शेत खात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाहीतर या अवैध उत्खनांच्या विरोधात आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close