महागाव तालुक्यातील घोणसरा येथील शेतकऱ्यांच्या शेतातून ५ लाख ७६ हजार रुपयाचा गांजा जप्त!

पुसद: मतदारसंघातील महागाव तालुक्यातील घोणसरा येथील शेतकऱ्यांच्या शेतात अमली पदार्थाचे ५० झाडे त्याचे एकूण वजन ३६ किलो किंमत अंदाजे ५ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई दि.३ नोव्हेंबर रविवारी रोजी बबनसिंग किसन राठोड वय ३३ वर्षे रा. घोंसरा ता. महागाव जि. यवतमाळ, यांच्या शेतात अमली पदार्थाचे ५० गांजाची वजन ३६कीलो किंमत अंदाजे ५ लाख ७६ हजार रुपये आहे. या प्रकरणी शेतकरी बबनसिंग किसन राठोड या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.शेतकरी बबनसिंग किसन राठोड हा गांजाची तस्करी करीत असल्याचा संशय होता. पोलिसांनी गोपीनीय माहिती वरुन ही कारवाई केली ही कारवाई पोलीस अधीक्षक साहेब यवतमाळ तसेच अप्पर पोलीस अधीक्षक साहेब यांचे सूचनेप्रमाणे,उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनात एपीआय राऊत,पिएसआय ससाणे, एएसआय शेख मकसूद,एएसआयअशोक जाधव,पोलीस हवालदार गावंडे, केवटे, पोलीस नाईक सुनील माथणे, रणजित रबडे,पोलीस शिपाई महेश बाबर,यांनी केली



