क्राइम

शेतकऱ्यांकडून तिस हजारांची लाच घेताना महसूल सहायक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

महागाव/प्रतिनिधी: शेतकऱ्याच्या शेतातील रखडलेल्या पाणंद रस्त्याचे काम मार्गी लावून देण्यासाठी शेतकऱ्यांकडून ३० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी महागाव तहसील कार्यालयातील लाचखोर महसूल सहायक आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.                   प्रवीण कुमार महादेव पोहरकर असे या लाचखोर कर्मचाऱ्याचे नाव आहे. महागाव तहसील कार्यालयात महसूल सहाय्यक या पदावर तो कार्यरत आहे. यवतमाळ येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज बुधवारी (ता.२६) सायंकाळी ५:०० वाजण्याच्या सुमारास तहसील कार्यालयात सापळा रचून ही कारवाई केली आहे.याबाबत प्राप्त माहिती अशी की,महागाव तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे यांची हिवरा गावाला लागून १ हेक्टर ४१ आर शेती आहे. हिवरा जिनिंग फॅक्टरीला लागून असलेला पाणंद रस्ता हा शेताकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. परंतु हा पाणंद रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून शेतकऱ्याला शेतात ये- जा करण्यासाठी रस्ता शिल्लक राहिला नसल्याने त्यांनी वारंवार महसूल प्रशासनाकडे रस्ता मोकळा करून देण्यासाठी तक्रारी विनंती उपोषण केले. या शेतकऱ्यांनी मार्च २०२१ पासून सरकारी कार्यालयांच्या पायऱ्या झिजवल्या यापुर्वी त्यांनी महागाव तहसील कार्यालयासमोर तब्बल तीन वेळा उपोषणही केले व आजवर शेकडो निवेदने दिले. परंतु संवेदनशुन्य शासन आणि प्रशासने शेतकऱ्याच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेता वेळोवेळी उडवा उडीचे उत्तरे दिली त्यामुळे अन्यायग्रस्त शेतकऱ्याने यवतमाळ येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरच टॉवर वर चढून शोले स्टाईल आंदोलन सुध्दा केले होते. यावरही कुठलाही तोडगा न निघाल्यामुळे पांडुरंग आंडगे यांनी हिवरा येथे टॉवर वर चढून विरुगीरी करीत पुन्हा एकदा आंदोलन केले तरीही या शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली नाही महागाव तहसील कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभागात या शेतकऱ्याच्या पाणंद रस्त्याचा प्रश्न आज पर्यंत लाल फितीत अडकून पडला आहे. तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक यांनी प्रवीण कुमार पोहरकर यांनी फाईल क्लिअर करण्यासाठी या शेतकऱ्याकडे ४० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली असता तडजोडी अंती ३० हजार रुपये घेण्यास तो राजी झाला आधीच पांदण रस्त्याचा प्रश्न निकाली निघत नसल्यामुळे अखेर या वैतागलेल्या शेतकऱ्यांने या प्रकरणाची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांच्याकडे केली असता लाच लुचपत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन शहाणीचा केली असता, त्यांनी महागाव तहसील कार्यालयात सापळा लावला. कार्यालयाची शासकीय वेळ संपत आल्यानंतर लाचखोर महसूल साहकाला तहसिल कार्यालयातच रंगेहात ३० हजाराची लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष जाळ्यात घेतले असून त्यानंतर चौकशी साठी त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात नेण्यात आले. पोहरकर यांने शेतकऱ्याला स्वतः लाच मागितली की, यात आणखी कोणी वरिष्ठ अधिकारी सहभागी आहे याची सखोल चौकशी केली जात आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक मारोती जगताप,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनात, पोलीस उपअधीक्षक उत्तम नामवाडे, जयंत ब्राम्हणकर, सचिन भोयर,राकेश सावसाकडे, सचिन सोनवणे,सुरज मेश्राम, भागवत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय कांबळे यांनी केली आहे.

महसूल सहाय्यक पोहरकर याने यापूर्वी चार पत्रकारांवर केला होता खंडणीचा गुन्हा दाखल

३० हजाराची लाच घेताना लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या प्रविणकुमार पोहरकर याने तीन महिन्यापुर्वी महागावातील चार पत्रकारांवर खंडणी मागीतल्याची तक्रार देऊन त्यांना अटक करण्यास भाग पाडले होते. साळसुदपणाचा आव आणणारा हा लाचखोर आज स्वतःच लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
लाचलुचपत विभागाच्या
या कारवाईमुळे महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close