सामाजिक

छत्रपती शिवराय जयंती सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन!

पुसद  :छत्रपती शिवराज जन्मोत्सव समिती तर्फे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४व्या जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१६ते १८फेब्रुवारी पर्यंत राजमाता जिजाऊ परिसर स्व.शेषराव पाटील जिनिंग, पुसद येथे शिवपर्व तर १९फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रमुख कार्यक्रम होतील.१६फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७:००वाजता आमदार ॲड. इंद्रनिल नाईक यांच्या हस्ते व प्रमुख अतिथिंच्या उपस्थितीत शिवपर्व चे उदघाट्न होणार आहे. तसेच ४फेब्रुवारी रोजी संपन्न झालेल्या व १४हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेल्या शिव सामान्य ज्ञान स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. त्यानंतर शिवश्री गणेश शिंदे यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जिवन चरित्रवर व्याख्यान होईल.१७फेब्रुवारी रोजी सायंकाळी,६:००वाजता छत्रपतींच्या जीवनावर आधारित शिवशौर्य गाथा ही आंतर शालेय सांस्कृतीक स्पर्धा होईल.१८फेब्रुवारी रोजी समाजप्रबोधन कार पंकज पाल महाराज यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम होईल.१९फेब्रुवारी रोजी सकाळी 8वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमदार ॲड.इंद्रनिल नाईक, आमदार ॲड.निलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या सह सर्व शिव प्रेमीच्या उपस्थितीत शिवपुजन कार्यक्रम होईल. त्यानंतर लगेच मोटर सायकल रॅली काढण्यात येईल. दुपारी २:००वाजता श्री शिवाजी हायस्कुल मधून भव्य शोभयात्रा निघणार असून या शोभयात्रेचे थेट प्रक्षेपण छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, वसंतराव नाईक चौक इटावा वार्ड, श्रीरामपूर या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या भव्य एलईडी स्क्रीन वर केले जाईल.या भव्य शोभयात्रेत छत्रपती शिवरायांची पालखी सह प्रथमच केरळचे कथक नृत्य व बँड पथक, राज्य पुरस्कार प्राप्त श्रीराम हरिपाठ भजनी मंडळ बेंबळा,मर्दानी पथक दर्यापूर, खामगाव च्या तानाजी व्यायाम शाळेचे मल्लखांब पथक,दुर्गा वाहिनी पथक,रामराज्य ढोल पथक,युवा जल्लोष ढोल पथक,बंजारा लोकनृत्य,किनवटचे आदिवासी ढेमसा नृत्य तसेच पुसद तालुक्यातील व शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांचे झाक्या, सिंहासन आरुढ व आश्वारुढ शिवराय व मावळ्यांच्या वेषभुषेतील शिवप्रेमी यांचा सहभाग राहणार आहे.वरील सर्व कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी शेकडो शिवभक्त अथक परिश्रम घेत असून जास्तीत जास्त शिव प्रेमींनी सर्व कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य संयोजक तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद व आयोजन समिती सदस्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close