जिवंत काडतुसह देशी कट्टा जवळ बाळगणारे दोन युवक पोलिसाच्या जाळ्यात;पुसद शहर डि.बी.पथकाची प्रशंसनीय कामगिरी!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री डिबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे आपल्या सहकाऱ्यां सोबत गस्तीवर असतांना त्यांना गोपनीय गोपनीय माहीती मिळाली की, मुखरे चौक पुसद येथे दोन युवक कमरेला देशी कट्टा लावून फिरत आहेत, त्याबाबत पुसद शहर पोलीस स्टेशन ठाणेदार यांना तात्काळ वर्दी देण्यात आली त्यावेळी पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ आदेश दिले त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे डी.बी.सहकाऱ्यांना घेऊन घटनास्थळाकडे रवाना झाले असता डीबी पथकाने तात्काळ सापळा रचला ही कारवाई रात्री ०९;५० वा. चे सुमारास मुखरे चौक येथे दोन युवक उभे असलेले दिसले, पोलीस आल्याचे पाहताच त्या ठिकाणावरून पळून तयारीत असताना पोलीसांनी त्यांचा पाठलागा करून त्यांना जाळ्यात घेवून त्यांचे नाव गाव विचारता त्यांचे नाव अक्षय विजय घाटे वय.२३ वर्ष, धंदा मजुरी, जात. मातंग, रा. शिवाजीवॉर्ड पुसद ता पुसद जि. यवतमाळ व राहूल सुभाष जाधव वय.२६ वर्ष, जात. मातंग, रा. शिवाजीवॉर्ड पुसद ता.पुसद जि. यवतमाळ असे असल्याचे त्यांनी सांगितले नंतर त्यांची अंगझडती घेतली असता अक्षय घाटे याचे जवळ कमरेला गावठी बनावटीचे सिल्वर कलरचा देशी कट्टा (पिस्टल) व दोन जिवंत काडतूस सह एकूण कि.रू.३००००/- मिळून आल्याने ते जप्त करून ताब्यात घेतले. त्यांनतर शहर पोलीस स्टेशन येथे पो.हवा प्रफूल इंगाले यांनी दिले फिर्यादी वरून अप.क्र. ४७/२०२४ कलम ३/२५ शस्त्र अधिनियम १९५९ प्रमाणे गुन्हा नोंद करून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड साहेब यवतमाळ, अपर पोलीस अधिक्षक पियुष जगताप साहेब तसेच सहायक पोलीस अधिक्षक तथा उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे सुचना प्रमाणे डी. बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो.हवा. प्रफूल इंगोले, पो.ना. मनोज कदम, पो.ना. दिनेश सोळंके, पो.कॉ. सिध्दोधन भगत, पो.कॉ.आकाश बाभूळकर यांनी केली आहे.



