क्राइम

पंचवीस हजाराची लाच स्वीकारताना आरोग्यअधिकारी एसीबीच्या जाळ्यात

महागाव/प्रतिनिधी (संदीप ढगे): महागाव येथील प्रभारी तालुका अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. नरेंद्र आडे यांना पंचवीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना यवतमाळ येथील एसीबीच्या अधिकाऱ्यांनी आज साडेपाच वाजण्याच्या सुमारास सापळा रचून रंगेहात पकडले असून पुढील चौकशीसाठी पुसद येथील शासकीय विश्रामगृहात नेवून बयान नोंदविण्यात येण्याची प्रक्रिया सुरू असल्याची सुत्रांची माहिती आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,महागाव येथे कार्यरत असलेले प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे यांनी आशा वर्कर पदासाठी आदेश काढण्याकरिता एक लाख रुपयांची लाच मागितली असल्याची तक्रार माळवागत येथील पृथ्वीराज चव्हाणयांनी केली होती पृथ्वीराज चव्हाण यांची पत्नी कोमल ही एम एस डब्ल्यू (MSW) शैक्षणिक पात्रता धारण केली असल्याने तिची नुकतीच आशा वर्कर पदांसाठी मुलाखत सुध्दा घेण्यात आली होती या मुलाखतीनंतर तिचा नोकरीचा आदेश काढण्यासाठी एक लाख रुपयाच्या लाचेची मागणी करण्यात आली त्यामुळे तक्रारकर्ता पृथ्वीराज चव्हाण यांनी माझी पत्नी उच्चशिक्षित आहे तुम्ही पहिले आदेश काढा नंतर जे द्यायचे ते देऊ असे सांगत त्यांना विनंती केली त्यावेळी या लाचखोर अधिकाऱ्यांनी आता पंचवीस हजार रुपये द्या अशी मागणी केली तशी तक्रार चव्हाण यांनी यवतमाळ येथील एसीबी कडे नोंदविली त्यावेळी या तक्रारीची एसीपीच्या अधिकाऱ्याने गंभीर दखल घेऊन सापळा रचून प्राथमिक आरोग्य केंद्र काळी दौलत खान येथे २५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना प्रभारी तालुका आरोग्य डॉ नरेंद्र आडे यांना रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई अँटीकरप्शन पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, अंमलदार अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचिन भोयर, महेश वाकोडे, सविता राठोड, चालक संजय कांबळे यांनी केल्याने लाचखोरांची धाबे दणाणले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close