सामाजिक

मॉं जिजाऊ जन्मोत्सवात सहभागी व्हा!-मराठा सेवा संघाचे आवाहन

पुसद: १२जानेवारी रोजी होऊ घातलेला ४२६ व्या आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार असल्याने जिजाऊ जन्मोत्सवात सहकुटुंब, मित्रमंडळीसह शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन मराठा सेवा संघाच्या पदाधिकार्‍यांनी केले आहे.
मातृतिर्थ सिंदखेड राजा(जि.बुलडाणा) येथे १२ जानेवारी रोजी गेल्या दोन दशकापासून जिजाऊ जन्मोत्सवाला येणाऱ्या जिजाऊ प्रेमींच्या गर्दीत दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होऊ लागली आहे
जिजाऊ प्रेमींच्या उपस्थित जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी प्रमाणे पुस्तके विक्री स्टॉल,सामुहिक विवाह सोहळा,सत्कार, व्याख्यान,सामाजिक प्रबोधन व सार्वजनिक सोहळा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
ता.४ ते ता.१० ला सावित्री—जिजाऊ दशरात्रोत्सवानिमित्त दररोज सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन, जिजाऊ सृष्टीवर (ता.११)सकाळी अकरा वाजता बक्षीस वितरण समारंभ, सायं. ५ वा. जिजाऊ राजवाड्यावर दीपोत्सव, सायंकाळी साडेपाच वाजता राजवाडा ते जिजाऊसृष्टी दरम्यान मशाल यात्रा तर सायंकाळी साडेआठ वाजता महिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र राज्यातर्फे सादर करण्यात येणार आहे.
ता.१२ जानेवारीला सकाळी सहा वाजता राजे लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यात जिजाऊ जन्मस्थळी महापूजा, सकाळी सात वाजता राजवाडा ते जिजाऊ सृष्टी दरम्यान भव्य पालखी सह वारकरी दिंडी, सकाळी नऊ वाजता शिवधर्म ध्वजारोहण, सकाळी नऊ ते दीड दरम्यान शाहिरांचे पोवाडे, सांस्कृतिक कार्यक्रम विशेष सत्कार, प्रकाशन सोहळा, सामूहिक विवाह सोहळा, विधवा,घटस्फोटीत व पुनर्रविवाह सोहळा यांचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे तर प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व कक्षांचे प्रदेशाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष राहणार आहेत.
दुपारी दोन ते सहा दरम्यान मुख्य कार्यक्रम शिवधर्म पीठ येथे आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघ संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार प्रतापराव जाधव, खासदार रक्षा खडसे, आमदार राजेंद्र शिंगणे, आमदार संजय गायकवाड, आमदार डॉ. संजय कुटे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, आमदार श्वेता महाले, आमदार अॅड.आकाश फुंडकर, आमदार राजेश इकडे,आमदार मंगेश चव्हाण, आमदार वसंत खंडेलवाल, आमदार अॅड. किरण सरनाईक, आमदार धिरज लिंगाडे,माजी आमदार रेखाताई खेडेकर,सिंदखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सतीश तायडे, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष इंजि. विजयकुमार घोगरे, जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहकर,मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अर्जुन तनपुरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, महासचिव चंद्रशेखर शिखरे, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठा विश्र्वभूषण पुरस्काराने प्रमोद मानमोडे, मराठा क्रीडाभूषण पुरस्काराने शाम शिंदे यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
संत चोखामेळा महाराज जन्मोत्सवानिमित्त ता.१३ मेहूणाराजा(ता.देऊळगाव राजा)येथे सायं.७ वा.डाॅ.बालाजी जाधव यांच्या शिवकिर्तनाचे तर ता.१४ जानेवारी सकाळी ८.०० वा. संत चोखामेळा महाराज जन्मस्थळी महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमाला शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दिगंबर जगताप,जिल्हाध्यक्ष सुरेश कदम,पुसद तालुकाध्यक्ष हरगोविंद कदम व त्यांच्या सर्व कक्षांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close