सामाजिक

पुसद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती उत्साहात साजरी!

विविध पारंपारिक नृत्य,व मोटरसायकल रॅलीने पुसदकरांचे लक्ष वेधले

पुसद:पारंपारिक नृत्य,लेझीम झाकी,वेशभूषा अशा विविध छत्रपती शिवरायांचे देखावे,मोटार सायकल रॅली मध्ये महाराष्ट्राचे अखंड आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पुसद मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या जयंतीची सुरुवात येथील स्थानिक शेषराव पाटील जिनिंग प्रेसिंग मार्केट मधून करण्यात आली व दरवर्षी प्रमाणे या हि वर्षी हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंती निमित्त छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती द्वारा दि.१६ ते१९ फेब्रुवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते १० वाजे दरम्यान शिव विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले होते.

स्व.शेषराव पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सोसायटीचे प्रांगण पुसद येथे दि.१६ फेब्रुवारी रोजी शिवश्री गणेश शिंदे यांचे छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन चरित्रावर आधारित व्याख्यान व दि.१७ फेब्रुवारी रोजी शिवशौर्यगाथा या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे छत्रपती शिवराया वरील घटनाक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.

व दि.१८ फेब्रुवारी रोजी शिवश्री पंकज पाल महाराज सप्त खंजेरी वादक यांचे समाज प्रबोधन व दि.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवराय यांचे शिवपूजनाचा कार्यक्रम पार पडला.

त्यानंतर लगेचच भव्य अशी मोटार सायकल रॅली काढण्यात आली व दुपारी २ वाजेपासून भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.या शोभायात्रेमध्ये शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी – महाराज व मावळ्यांची वेशभूषा करून मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close