ईतर

शासनाचा निधी नाल्यात; वसंतपूर गावातील नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नाली कोसळली; संबंधित  ठेकेदारासह अभियंत्यावर कारवाईची मागणी!

पुसद : पंचायत समितीच्या अधिकार क्षेत्रातील कृष्णनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मौजे वसंतपूर गावात पाच ते सहा दिवसांपूर्वी शासनाच्या जन सुविधा निधीतून दाह लाख रुपये खर्च करून सिमेंट काँक्रेट नालीचे अत्यंत निकृष्ट बांधकाम करण्यात आले या बांधकामाचा बोगसपणा आता चव्हाट्यावर आला आहे. यांनी कृष्ट दर्जाच्या बांधकामा टक्केवारीचे ग्रहण लागले आहे अवघ्या काही दिवसापूर्वी पूर्ण झालेले निकृष्ट दर्जाचे सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम अचानक एका पाण्यात कोसळल्याने संबंधित ठेकेदारांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा नमुना पुन्हा उघड झाला आहे. अशा कारभारामुळे शासनाचा कोट्यवधींचा निधी वाया जात असल्याचा संताप गावकरी मात्र संताप व्यक्त करत आहेत.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीमध्ये सुरु असलेल्या विकास कामांना टक्केवारीचे ग्रहण लागले असून हे विकास कामे अत्यंत निकृष्ट होत असून याकडे संबधित लोकप्रतिनिधी अधिकारी अभियंते यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. अशीच एक घटना तालुक्यातील कृष्णानगर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मौजे वसंतपूर येथील निकृष्ट दर्जाचे बांधकाम केलेल्या सिमेंट काँक्रेट नालीचा बोगसपणा चव्हाट्यावर आला आहे. शासनाच्या जन सुविधा योजनेतून जवळपास दहा लाख रुपयांचा निधी खर्च करून पाच-सहा दिवसापूर्वी या गावात सिमेंट काँक्रीट नाल्याचे बांधकाम करण्यात आले परंतू ह्या सिमेंट काँक्रेट नालीचे बांधकाम संबंधित ठेकेदार संबंधित प्रशासक सचिव व जि प बांधकाम विभागाचे अभियंता सोबत संगनमत करून सिमेंट काँक्रेट नाली बांधकाम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे साहित्य वापरून करण्यात आले. यामध्ये डस्ट, नाममात्र सिमेंट, कही माती मिश्रीत नाल्यांची रेती, आणि नाममात्र लोखंड व गिट्टीचा वापर करण्यात आला तसेच या नाली बांधकामात नालीतील बेड मुरूम भरून आणि सिमेंट दगडाचा कमी वापर केला आहे. तर नालीची खोली आणि रुंदी देखील कमी करण्यात आली असून हे निकृष्ट दर्जाचे नालीचे बांधकाम नुकतेच पाच-सहा दिवसापूर्वी करण्यात आल्याने ही सिमेंट काँक्रेट नालीचे बांधकाम थोड्याशा पावसाने जमीन दोस्त झाले त्यामुळे या बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या या विकास कामांना टक्केवारीचे ग्रहण’ (कमिशन किंवा लाचखोरी संस्कृती) लागल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नाली आणि गटारांची बांधकामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे चित्र या गावासह तालुक्यातील अनेक ग्रामीण भागांतील गावात पाहायला मिळत आहे जेव्हा विकासकामांचा एकूण निधीमधून मोठा हिस्सा अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि दलाल यांच्यात ‘टक्केवारी’ म्हणून वाटला जातो, तेव्हा प्रत्यक्ष कामासाठी अगदीच तोकडा निधी शिल्लक राहतो. परिणामी, ठेकेदार हलक्या प्रतीचे साहित्य वापरून काम ताबडतोब उरकून घेतात. त्यामुळे या विकास कामांना टक्केवारीचे ग्रहण लागले आहे.तर संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे संबंधित कनिष्ठ अभियंता ठेकेदार, सचिव, व काही लोकप्रतिनिधी यांच्या सोबत संगनमत करून आपल्या खाऊगिरीमुळे स्वतः च्या फायद्यासाठी निकृष्ट दर्जाच्या कामाची एमबी, सिसी, बोगस कामाचे बिले काढण्याचा गोरख धंदा राजरोसपणे सुरू आहे त्यामुळे शासनाचा लाखो रुपयाचा निधी पूर्ण नाल्यात वाहून जात आहे.तर या सिमेंट काँक्रेट नालीच्या कामाचा दर्जा हा अतिशय निकृष्ट असून इस्टिमेटनुसार काम करण्यात आले नसल्याने या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची गुणवत्ता तपासून सखोल चौकशी करावी तसेच सबंध ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून शासकीय सेवेत राहून शासनाचा निधीचा अपहार करणाऱ्या संबंधित अभियंत्यासह सचिव प्रशासक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून यांच्या सर्विस बुकावर सुद्धा या गुन्ह्याची नोंद चढवावी तसेच यांच्या पगारीतून शासनाचा निधीचा अपहार झाला ते वसूल करावा आणि या बोगस कामाचे देयक काढण्यात येऊ नये अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close