गाव गाड्यातल्या माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून सामाजिक बांधिलकी जपणारे सरपंच ‘रवी पवार’ -शेतकरी नेते मनीष जाधव

पुसद: विधानसभा क्षेत्रातील व महागाव तालुक्यातील शेवटच्य टोकाचे,अति दुर्गम व निसर्गाच्या कुशीत वसलेलं व शहरी भागापासून दूर असलेलं गाव म्हणजे कोंनदरी या गावातील नागरिकाकडून माझी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी फेर निवड झाली यासाठी गावातील शेतकरी कडून यथोचित हृदयस्पर्शी सत्कारा सोहळा घेतला होता या निमित्त या गावाला जाण्याचा मला योग आला , या ठिकाणी याच दिवशी *शासन आपल्या दारी*श हा लोकाभिमुख उपक्रम येथील *युवा सरपंच रवी पवार यांनी घेतलेला होता , याला मी यावेळी भेट दिली, विविध विभागाचे अधिकारी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये कॅम्प लावून उपस्थित होते जणू एक उपक्रमाला *जत्रेचे* स्वरूपच म्हणावं असं या *शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांच उस्फूर्त सहभाग नोंदविला गावकरी आपल्या प्रशासकीय अडीअडचणीसाठी अधिकाराने पोटच्या मुलासारखं आपल्या हक्काच्या सरपंचाकडे तक्रार मांडत होती व त्या तक्रारीचे निराकरण करण्याचं काम हा युवा सरपंच रवी पवार विना तक्रार करत होता *काही माणसं पदामुळे मोठी होत नाही तर ते त्यांच्या कार्यामुळे समाजाच्या हृदयात कायम मोठी होतात* शोषित , पीडित, उपेक्षित श्रमजीवी गरजू आणि गोरगरीब कुटुंबाच्या मदतीसाठी कायम तत्पर असणाऱ्या या युवक सरपंचाने जणू या गावकऱ्यांच्या मध्ये उत्तुंग आत्मविश्वास निर्माण केला येथील मराठी शाळेत दर्जेदार शिक्षण असून हे डिजिटल व भव्य वास्तू आहे यामध्ये सर्व भौतिक संसाधन उपलब्ध आहे गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर सरपंचाच्या कार्य शैलीमुळे समाधानाचे सकारात्मक भाव होते *माती आणि मातीतल्या माणसाला जपणाऱ्या* या सरपंचाने खऱ्या अर्थाने ग्रामीण विकासाच्या गावगाड्यातल्या माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्याचा प्रयत्न हा खरंच वाखाण्याजोग , हे सर्व जमिनीवरचं वास्तव पाहून मी भारावून गेलो जमिनीशी नातं ठेवून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून रवी पवार यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत शिवसेना शिंदे गटातून *पालकमंत्री संजय राठोड साहेब यांच्यावर विश्वास टाकून माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ बी. एन. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली राजकीय वाटचाल करूनच ते महागाव तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आहे* सौजन्यशील,
सोज्वळ ,मितभाषी, प्रेमळ विनम्र अशा प्रतिभावंत व्यक्तित्वाचा धनी असलेला या युवक सरपंच रवी पवार यांचा आदर्श घेऊन तालुक्यातील तांडा ,गावातील, वाडी वस्तीवरील युवकांनी आपल्या गावाचा सर्वांगीण रचनात्मक विकास साधावा, सत्ता ही व्यवस्था परिवर्तनाच माध्यम म्हणून साधन आहे यासाठी विधायक विकासासाठी सामूहिक रत्नांची गरज आहे निस्वार्थ, निष्कलंक राहून चारित्र्यसंपन्नता जपत समाजहिता झटणाऱ्या , एका अपेक्षित असलेले नेतृत्व निर्माण व्हावं यासाठी सुरुवात आपल्यापासून करावी युवा सरपंच रवीच्या पुढच्या कालखंडातील राजकीय वाटचालीसाठी माझ्या हृदयापासून शुभेच्छा..या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल पवार व यावेळी गौतम रणवीर सह मोठ्या संख्येने गावातील नागरिक उपस्थित होते.



