ईतर

शेतकऱ्यांच्या अधिकार साठी लढा देणे हीच माझी सामाजिक बांधिलकी -शेतकरी नेते मनीष जाधव

महागाव :तालुक्यातील पोखरी येथील शेतकरी विविध सहकारी कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क, अधिकारासाठी मातीशी नाळ जोडून ठेवून शेतकऱ्यांचे लढाऊ नेतृत्व शेतकरी नेते मनीष जाधव यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी फेर निवड झाल्याने त्यांचा हृदयस्पर्शी सत्कार सोहळा* आयोजित करण्यात आला होता. विविध सहकारी कार्यकारी सोसायटीच्या कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवराय , राष्ट्रपिता महात्मा गांधी, राष्ट्रपिता महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , शेतकऱ्यांच्या आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेब यांच्या फोटोचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली शेतकरी नेते मनीष जाधव यांची ही निवड म्हणजे फक्त एका व्यक्तीची निवड नसून, आपल्या सारख्या कष्टकरी बळीराजाच्या आवाजाला व भाऊंच्या कार्याला मिळालेल निरपेक्ष न्याय असून या निवडीमुळे व या सत्कार सोहळ्याच्या त्यांच्या उपस्थितीमुळे पोखरी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला हा आमच्या मातीसाठी अभिमानाचा क्षण आहे, असे भावनिक उदगार या सोसायटीचे अध्यक्ष हर्षवर्धन मुनेश्वर यांनी आपल्या अभिभाषणातून व्यक्त केले.या सत्कार सोहळ्याला उत्तर देताना आपल्या अभिभाषणातून शेतकरी नेते मनीष जाधव यांनी विदारक व दाहक वास्तव्यावर मत व्यक्त करत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या न्याय हक्क अधिकार व आपल्या अस्मिता व शोषणमुक्त व्यवस्था निर्माण करण्यासाठी संघटित होऊन संघर्ष कराव सध्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी फार कठीण असून *राहू नका बेकीने , आता वागू एकीने* जात, धर्म, पंथ , राजकीय पक्षाच्या निष्ठेतून शेतकरी एकच धर्म समजून संघटित झाल्याशिवाय आपल्याला निरपेक्ष न्याय मिळणार नाही याची जाण शेतकऱ्यांनी ठेवावी शेतकऱ्यांच्या न्याय, हक्क अधिकारासाठी लढणे ही माझी भूमिका राजकीय पक्षाच्या हंगामी नेत्यासारखी नसून , ती माझ्या रक्तात भिनलेली आहे , शरीरात श्वास असेपर्यंत शेतकऱ्यांच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी अविरत लढत राहू आपण केलेल्या सकारात्मक सत्कारातून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी मला निश्चित ऊर्जा व बळ मिळेल शेतकऱ्यांच्या या हृदयस्पर्शी सत्काराने मी भारावून गेलो , असा आशावाद शेतकरी नेते मनीष जाधव यांनी आपल्या अभिभाषणातून व्यक्त केला यावेळी या गावाचे सरपंच प्रवीण चव्हाण , श्री. हर्षवर्धन मनोहर मुनेश्वर सोसायटी अध्यक्ष पोखरी ,मा. प्रभूलालजी जयस्वाल , रामेश्वर पाटील , पोलीस पाटील सेवा नगर , गौतम रणवीर रिपाई गट अध्यक्ष विशाल पवार , कोनदरी , सुधीर भाऊ देवानंद इंगोले , रमेश कान्हा मोहकर सोसायटी संचालक, सुधाकर रामचंद्र पवार सोसायटी बँक प्रतिनिधी, अमोल पांडोळे सोसायटी संचालक अमित राठोड , प्रमोद जयस्वाल यांच्यासह मोठ्या संख्येने यावेळी नागरिक सह शेतकरी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close