ॲड.राहुल बाजीराव शेंडे यांना आंतराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित!

यवतमाळ:गडचिरोली- इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन द्वारा ९ वा आंतरराष्ट्रीय पत्रकारिता सन्मान सोहळा दि.१८ ऑगस्ट २०२६ ला महाराष्ट्रातील जालना येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्माननीय मान्यवरांचे उपस्थितीत संपन्न झाला. या संपूर्ण सोहळ्याचे नियोजन हे प्रामुख्याने इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.सेराज अहम्मद कुरैशी (उत्तरप्रदेश) तसेच कार्यकरी मंडळ यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र प्रदेश इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय उत्साहात पूर्ण केले. सदर पत्रकारिता सन्मान सोहळ्या दरम्यान राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पत्रकारिते सोबतच सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक मान्यवरांना गौरविण्यात आले. या प्रसंगी ॲड.राहुल बाजीराव शेंडे यांना आंतरराष्ट्रीय बाळशास्त्री जांभेकर Best Content Writer’ आणि ‘Good Performer of Editor’ तसेच ‘Master of Journalist’अशा वेगवेगळ्या तीन सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ॲड.राहुल बाजीराव शेंडे हे एक उत्तम साहित्यिक व प्रशिक्षक असून सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, राजकीय, पत्रकारिता आणि कायदेविषयक शास्त्राचे अभ्यासक आहेत. या वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांची व्यासंगता, अनुभव, कार्यक्षमता, सहकार्य अशा विशेष योगदानात्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सन्माननीय व्यासपीठावरून बोलतांना ॲड.राहुल शेंडे यांनी इंडियन जर्नालिस्ट असोसिएशनच्या सर्व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे पदाधिकारी यांचे खास आभार मानून, त्यांनी आधुनिकतेच्या प्रवाहात बदलत्या पत्रकारितेच्या स्वरूपाची दखल घेत, प्रशिक्षित पत्रकारिता म्हणजे काय? प्रशिक्षित पत्रकारितेची आवश्यकता का आहे? पत्रकारितेचा स्तर काय असला पाहिजे आणि काय आहे? तसेच पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी, दायित्व, जबाबदारी सोबतच कायदेशीर संरक्षण यात काय समन्वय आहे? अशा अनेकाविध पैलू वरती त्यांनी प्रकाश टाकला. इंडियन जर्नालिस्ट असोसिएशन अंतर्गत पत्रकारिता क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या पत्रकारांचे शिक्षण-प्रशिक्षण, हक्क, अधिकार, कर्तव्य, जबाबदारी, संरक्षण आणि सन्मान अशा विविध क्षेत्रात अलौकिक असे कार्य करणारे एकमेव संघटन असून, मागील अनेक दशकापासून देश-विदेशातील पत्रकारिता क्षेत्राचा एक अद्वितीय आधारवड म्हणून नावलौकिकास आहे.



