ईतर

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक गुरुचरित्र पारायणाचे आयोजन!

पुसद : येथील सप्तगिरी नगर मध्ये असलेल्या श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात दरवर्षी प्रमाणे यावर्षीही श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त ९ ते १५ एप्रिल यादरम्यान अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

सामूहिक गुरुचरित्र पारायणामध्ये १६४ सेवेकरी सहभागी झाले असून या सप्ताह काळात अखंड स्वामीनाम जप, अखंड विना वादन व गणेश याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग,मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, पसायदान आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले.

यामध्ये महिला व पुरुष सेवेकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सप्ताहानिमित्ते बुधवारी महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला.यशस्वितेसाठी श्री स्वामी समर्थ केंद्रातील सदस्यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close