ईतर

दरोडाच्या तयारीत असलेल्या सराईत चोरट्याचा डाव शहर पोलीसांनी उधळला;१५ चोरीच्या मोबाईसह गुन्ह्यात वापरण्यात येणारे घातक हत्यार जप्त!

पुसद: शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत :दि.२७ डिसेंबर २०२३ रोजी डी.बी. पथकाचे प्रमूख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे हे आपले टीमसह सरकारी वाहनाणे रात्री गस्त करीत असतांना रात्री ३:०० वा.चे सुमारास लक्ष्मीनगर बोरगडी रोडवर वानरे फिचरच्या समोरील बाजूस झाडाचे आडोशाला अनोळखी पाच आरोपी संशयितरित्या दरोडा घालण्याच्तया तयारीने दबा धरून बसल्याचे दिसल्याने त्यांना सापळा रचून अतिशय कौशल्यपुर्ण रितीने पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील दोन इसम बाजूस उभ्या असलेल्या त्यांचे मोटर सायकल वरून पळून गेले. पकडलेले ०३ इसम अनिल नागोराव ढगे वय ३५ वर्ष, रा.शिवाजीनगर आंबेडकरवार्ड ता.जि. नांदेड, मोहम्मद शखील मोहम्मद इब्राहीम वय ४५ वर्ष, रा. खडकपुरा ता.जि. नांदेड, शेख मोशीन शेख अहमद वय ३२ वर्ष, रा.जनता न्यु आबदी शिवाजीनगर ता.जि.नांदेड यांची झडती घेवून त्यांचेजवळ असलेल्या बॅगची पाहणी केली असता त्यांचेकडे वेगवेगळया कंपनीची एकूण १४ चोरीचे मोबाईल, ०१ चोरीची मोटार सायकल, दोन चाकू,एक लोखंडी कोयता, एक आरा पत्ता, एक लोखंडी रॉड, मिरची पावडर, लोखंडी पकड, एक २२ फूट लांब रस्सी, रोख २०००/- रू. असा एकूण १,४१,६५०/- रू.चा मुद्देमाल मिळून आल्याने पो.हवा/प्रफूल इंगोले यांनी शहर पोलीस स्टेशन पुसद  यांनी दिले फिर्यादीवरून पुसद शहर पोलीस स्टेशन अप.क. ८४०/२०२३ कलम ३९९, ४०२ भा.द.वी. प्रमाणे एकूण ०५ आरोपींचे विरूध्द सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांनी सदर बाबत सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर यांना माहीती देवून त्यांनी दिले सुचना प्रमाणे डी.बी. प्रमूख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डि.बी.स्टाफ यांनी सदर आरोपीकडे सखोल तपास करता आरोपींनी सदरचे मोबाईल हे माहूर, पुसद, दिग्रस या परिसरातून चोरी गेल्याचे कबूल केले असुन यातील आरोपी अ.क.०१ सराईत गुन्हेगार असुन त्याचेवर यापूर्वी नांदेड जिल्हयात चोरीचे एकूण ०३ गुन्हे, हिंगोली जिल्हयात चोरीचे एकूण ०२ गुन्हे तसेच नांदेड जिल्हयात दरोडा टाकण्याची पुर्वतयारीचा ०१ गुन्हा असे एकूण ०६ गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप,सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पकंज अतुलकर यांचे मार्गदर्शनाखाली व पुसद शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे सुचंना प्रमाणे डी.बी.प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो.हवा. प्रफूल इंगोले, पो.हवा. अतुल दातीर, पो.ना. दिनेश सोळंके, पो.ना. मनोज कदम, पो.कॉ आकाश बाभूळकर, पो.कॉ. शुध्दोधन भगत, पो.कॉ. वैजनाथ पवार, चा.पो.ना.सुनिल ठोंबरे तसेच वसंतनगर पोलीस स्टेशन कडील पो.हवा. मुन्ना आडे, पो.ना. संजय पवार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close