श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत व नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत सोहळा संपन्न!शक्ती आणि युक्ती वापरून स्वतःची प्रगती करा -पंकज पाल महाराज!

पुसद- स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने वर्ग १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ११ व्या वर्गातील नवप्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारोह अत्यंत उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य रामचंद्र हिरवे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून समाज प्रबोधनकार तथा सप्त खंजिरी वादक पंकज पाल महाराज, यासह प्रमुख अतिथी म्हणून यशवंतराव देशमुख, उपप्राचार्य दत्तात्रेय जीवने, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे प्रा. विक्रम ठाकरे विचार पिठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज ,लोकमान्य टिळक, अण्णाभाऊ साठे ,देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला मान्यवरांच्या स्वागतानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. या प्रसंगी शिक्षणातून संस्कार या विषयावर बोलताना समाज प्रबोधनकार पंकज पाल महाराज यांनी युवकांना उद्देशून वरील मार्मिक विचार मांडले. राष्ट्रीय सेवा योजना चे जिल्हा समन्वयक प्रा. गजानन जाधव यांनी आपल्या प्रस्ताविकातून हे महाविद्यालय शिक्षण घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांशी नाळ जोडून ठेवण्याचे काम करताना त्यांच्यात महाविद्यालया बद्दलची आस्था आणि प्रेम कायम राहील या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे नमूद केले.
पंकज पाल महाराज आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की संस्कार देणे हे वडीलाचे कर्तव्य आहे ,माणसाला माणूस बनवण्यासाठी संस्काराची गरज आहे प्रत्येकाने आपल्या मधील टॅलेंट ओळखून आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असावे हे करताना छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने शक्ती आणि युक्तीचा वापर करून स्वतःची प्रगती करावी आई वडील आणि शिक्षक यांचा आदर करा आपले शिक्षण आई-वडिलांच्या कामी आले पाहिजे अशी आपली वर्तणूक ठेवा. याप्रसंगी यशवंतराव देशमुख यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्ष भाषणातून प्राचार्य रामचंद्र हिरवे म्हणाले विद्यार्थ्यांनो खूप शिका परंतु शिकताना आपल्या आई-वडिलांचे संस्कार लक्षात ठेवा त्यांच्या कष्टाचे मोल झाले पाहिजेत असे शिक्षण घ्या. त्यानंतर वर्ग १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी व वर्ग ११वी मधील गुणवंत विद्यार्थी यांचा प्रमाणपत्र स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन प्रा. अमोल राठोड प्रा.निलेश जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.अर्चना पाल, प्रा. भाऊसाहेब देशमुख ,प्रा. योगिता काष्टे, प्रा. असिफ शेख, मोनिका मंदाडे विद्यार्थी प्रतिनिधी अभिषेक खनके, अक्षय राठोड ,छकुली राठोड ,पुनम जाधव ,कोमल पवार ,यांनी पुढाकार घेतला त्यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.



