जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा-शरद मैंद मोफत फिजिओथेरपी कॅम्पच्या आयोजनात वक्तव्य!
मोफत फिजिओथेरपी कॅम्पचे यशस्वी आयोजन ४८ ज्येष्ठांची तपासणी व सल्ला

पुसद: जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, आपल्या वाढत्या वयासोबत आपल्या शरीराची काळजी घेणे ही नितांत गरज आहे आणि म्हणूनच पुसद परिसरातील सर्व पितृतुल्य जेष्ठ मंडळीची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य सल्ला दिला जावा असे आम्हा सर्व लायन्स ला वाटले म्हणून आज येथे आपण मोफत फिजिओथेरपी कॅम्प चे आयोजन केले असे प्रतिपादन श्री शरद मैंद यांनी केले. लायन्स क्लब ऑफ पुसद सिटी व जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत फिजिओथेरपी कॅम्पमध्ये अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
लॉयन्स क्लब पुसदच्या माध्यमातून पुसद आणि पुसद परिसरातील विविध गावांमध्ये अनेक समाज उपयोगी उपक्रम सतत लायन्स क्लब द्वारा राबविले जातात. आरोग्याच्या दृष्टीने लिंबी पार्डी हे गाव क्लबने दत्तक घेतले असून गावातील संपूर्ण नागरिकांचे मोफत तपासणी करून त्यांना योग्य तो औषधोपचार व सल्ला तज्ञ् डॉ द्वारे दिल्या जातो.या माध्यमातून जनसेवा करण्याची संधी आम्हाला मिळते असे प्रतिपादन त्यांनी केले. क्लबच्या सामाजिक उपक्रमांतर्गत आज विरंगुळा केंद्र पुसद येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत फिजिओथेरपी कॅम्पचे आयोजन केले होते.
या शिबिरामध्ये शहर व परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला तज्ञ निरोफिजिओथेरपीस्ट डॉक्टर रघुराज जाजू व फिजिओथेरपीस्ट डॉक्टर अंजली बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सांधे दुखी, पाठ दुखी, गुडघेदुखी, स्नायूंचा ताण अशा समस्या असलेल्या जवळपास ४८ ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय सल्ला व उपचार देण्यात आला, तसेच त्यांना आवश्यक व्यायाम प्रकार शिकविण्यात आले. यामध्ये अनेकांनी प्रत्यक्ष पीजीओथेरपी उपचाराचा लाभ घेतला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून श्री शरद मैंद यांनी जेष्ठ नागरिक संघाच्या सर्व सदस्यांना लायन्स क्लब च्या माध्यमातून आरोग्य विषयक तपासणी व सल्ल्यासाठी दत्तक घेऊन वर्षात योग्य वेळी त्यांची आरोग्य तपासणी करण्याचे ठरविले .
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष श्री दयाराम चव्हाण, प्राध्यापक श्री फुके,लॉ श्री सुरज डुबेवार, लॉ डॉ जय भोपी,लॉ श्री मिलिंद राठोड, लॉ श्री नंदकिशोर देशमुख, लॉ श्री उमाकांत वानखेडे हे लाभले.शिबिरासाठी लॉयन्स क्लबचे लॉ यशवंत चौधरी ,लॉ ऍडव्होकेट भारत जाधव लॉ ऍडव्होकेट मनोज गाटगे ,लॉ संदीप जिल्हेवार ,लॉ राजू विश्वकर्मा, लॉ डॉक्टर गौतम ठाकूर व ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव श्री श्याम जोशी , श्री बियाणी, श्री गजानन शिखरे, श्री सूर्यकांत कोसलगे, डॉक्टर निलावार , प्राध्यापक सुरेश उत्तरवार व इतर सदस्य तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक लॉ मिलिंद राठोड, सूत्रसंचालन लॉ मनिष अनंतवार यांनी तर आभार लॉ उमाकांत वानखेडे यांनी मानले.



