बेलोरा येथे श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात डॉ.पंजाबराव देशमुख साहेब जयंती साजरी!

पुसद
:तालुक्यातील बेलोरा येथील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येथे भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक पंडितराव मस्के यांनी स्वीकारले. तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय आसोले, विठ्ठल ढाले विचारपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात वर्ग सहावीच्या कु. वैष्णवी गडदे, कु. सृष्टी मोरे कु. श्रद्धा मारकड, कु. प्राची भाकरे, कार्तिक मारकड ,वेदांत आवळे .यांच्या गीतांनी झाली.यावेळी प्रमुख पाहुणे संजय आसोले यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती दिली .त्यांचा जन्म झाला अमरावती जवळील पापळ या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण पापळ येथेच पूर्ण केले. व पुढील उच्च शिक्षणासाठी ते अमरावती व नंतर परदेशात जाऊन त्यांनी उच्च शिक्षण घेतले. व आपल्या भारत देशाच्या प्रगतीसाठी ,भारत देशाच्या विकासासाठी त्यांनी खूप मोलाचे कार्य केले. ते भारताचे पहिले कृषीमंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना त्यांचे हक्क ,त्यांचे अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी शेतकऱ्यांचे संघटन असणे फार गरजेचे आहे, असे सर्व शेतकऱ्यांना समजावून सांगितले. तसेच ते नेहमी म्हणायचे की,” शेतकरी सुखी, तर जग सुखी” असे त्यांनी सांगितले. यावेळी विठ्ठल ढाले यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना गीत म्हणून दाखविले. व मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंडितराव मस्के अध्यक्ष भाषणात म्हणाले की, डॉक्टर पंजाबराव देशमुख यांना लोक आदराने भाऊसाहेब देशमुख असे म्हणायचे. त्यांच्या नावाने अकोला येथे मोठे कृषी विद्यापीठ आहे. आणि त्या विद्यापीठातून अनेक गोरगरीब मुलामुलींना शेतीविषयक चांगल्या प्रकारे प्रशिक्षण दिल्या जाते .तसेच तेथे विविध बियाणे खत यांचे संशोधन करून शेतकऱ्यांची प्रगती जास्तीत जास्त होईल, शेतकऱ्यांचा विकास जास्तीत जास्त होईल अशा सर्व योजना राबविल्या जातात. असे त्यांनी आवर्जून सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भीमराव मनवर यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. शालिक वाघमारे, प्रा. योगेश आडे,प्रा . दत्तराव काळबांडे,प्रा.भास्कर मुकाडे ,सारजा वाढोणकर, विजय वंजारे ,संभाजी जाधव, रमेश तडसे, गजानन नरोटे, शंकरराव आसोले ,गणेश जाधव, विष्णू नप्ते ,जीवन राठोड, वेदांत मारकड, विठ्ठल पोले ,पांडुरंग मारकड, रोहन खेडकर, साईनाथ आवळे, इत्यादींनी सहकार्य केले. शेवटी सर्वांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



