ईतर

पुसद येथे ३० एप्रिल रोजी भव्य ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन! गुरुदेवभूषण व प्रार्थनाप्रेमी पुरस्काराचे होणार वितरण; गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार!       

पुसद : मानवतेचे महान पुजारी,ग्रामगीता निर्माते, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त येथील गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा पुसदच्या पुढाकाराने भव्य ग्रामजयंती महोत्सवाचे आयोजन येत्या गुरुवारी, ३० एप्रिल २०२६, रोजी करण्यात आले आहे. स्थानिक देशमुखनगरमधील जिजामाता चौकातील मंडळाच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनास्थळी सायंकाळी ठिक ७ वाजता आयोजित कार्यक्रमासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, नगराध्यक्ष मोहिनीताई नाईक, उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल, कार्यकारी अभियंता (वीज वितरण) जनार्दन चव्हाण, ठाणेदार सेवानंद वानखडे, कृषिभूषण दीपक आसेगावकर, जिल्हा सेवाधिकारी दत्ताभाऊ मारकड, डॉ राजेंद्र जाजू, मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे आदी मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.  याप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ, पुसद तालुका शाखेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे समाजप्रबोधनाचे कार्य आणि ग्रामगीतेचा प्रचार व प्रसार करणाऱ्या एका व्यक्तीला प्रतिष्ठेचा ‘गुरुदेव भूषण पुरस्कार’ व प्रत्येक गुरुवारच्या सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनेला वर्षभरात जास्तीत जास्त वेळा उपस्थिती दर्शविणाऱ्या दोन व्यक्तींना ‘प्रार्थना प्रेमी पुरस्कार’ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यंदा पुरस्काराचे नववे वर्ष आहे, हे विशेष.  ग्रामजयंती महोत्सवानिमित्त आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थना, प्रतिष्ठेचा गुरुदेव भूषण पुरस्कार व प्रार्थनाप्रेमी पुरस्कार वितरण सोहळा, राष्ट्रसंतांची खंजेरी भजने आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांसाठी मंडळाच्या सर्व सदस्यांनी पांढरा शुभ्र गणवेश परिधान करून वेळेपूर्वी उपस्थित राहण्याची विनंती गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा. नंदकुमार खैरे, सचिव ॲड गजानन साखरे, प्रचार प्रमुख राजेंद्र काळबांडे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरडकर, भजन प्रमुख माधवराव जाधव, सदस्य नंदकुमार पंडित, मनोहर बनस्कर, ज्ञानेश्वर ताकतोडे, प्रमोद जयस्वाल, विठ्ठल महाराज भोयर, भीमराव महाराज पवार, भगवान महाराज हातमोडे, डॉ शरद राऊत, रमेश सरागे, यशवंत देशमुख, डॉ अनिल भावसार, पांडुरंग बुरकुले, सुरेश कदम, विठ्ठल येवले, दीपक ठाकरे, प्रशांत आत्राम, अनिल अस्वार, निळकंठ घाडगे, नरेश ढाले, बाबासाहेब वाघमारे, प्रा. शंकर दंडारे, प्रा सुरेश गायकवाड, वसंत काळीकर, वसंत ढोणे, राजू पुरी, पांडुरंग शिनगारे, पुंडलिक भालेराव, यशवंत भगत, शिवलिंग पटवे, कैलास मस्के, संभाजी बळी, गजानन दाभाडे, मारोती सरगर, पंकजपाल महाराज, प्रा आकाश ताविडे, गजानन जाधव, रमेश बोरकर, गिरीश पदमगिरवार, राजू बनस्कर, शंकर सोळंके, महिला प्रतिनिधी छाया प्रकाश लामणे, मंगला पंडित, माया काळबांडे, पुष्पा खैरे, चंदा गोडसे, संध्या पवार, माधुरी वांझाळ, सुवर्णमाला पुरी, जया मोरे, चारू देशमुख, शीला जाधव, शशिकला सुरडकर, अश्विनी साखरे, आदींनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close