ईतर

सत्तरमाळ जंगल परिसरात सापडलेला अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून या खुनाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश!

साह लाखांची सुपारी घेवूनच खुन केल्याचं तपासात उघड आठ आरोपी अटक;खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील घटना!

पुसद : माळ पठारावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे सत्तरमाळ जंगल परिसरात दि४ऑगस्ट २०२६ रोजी अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला असल्याची माहिती उपविभाग पुसद येथे हजर असतांना माहीती मिळाली होती त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले असता सदर मृतदेहाची प्रथम दर्शनीय पाहणी केली असता अनोळखी इसमांस कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणाने पाटीवर, गळयावर चाकूने वार करुन दगड टाकून जिवेठार करून या परिसरात फेकले असावी असा पोलिसांना संशय आला होता त्यामुळे खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये अप क्रमांक ३४९/२०२६ कलम १०३ (१), भान्यास प्रमाणे दि.४ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

सदर घटनास्थळावर परिसरात प्रेताची पाहणी करता त्यास कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी कारणाने गळयावर, पाटीवर चाकूने तसेच दगडाने जिवेठार मारल्याने सदर मृतक यांची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेवून गुन्हा उघडकीस आणन्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक सा स्थागुशा यवतमाळ यांना आदेशित केले होते.त्यासाठी स्थागुशा कॅम्प पुसद कडील अधिकारी व अंमलदार यांच्या पथकांने गुन्ह्यांचे घटनास्थळी भेट देवून बारकाईने पाहणी केली. गुन्ह्यांचे ठिकाणी मिळून आलेल्या देशी दारुच्या बॉटलची बॅच, तसेच पाण्याची बाटली, मुंगडाळ रिकाम्या पॉकीटाचे पाहणी करुन सदरची देशी दारु भिंगरी संत्रा रिकाम्या बॉटली वरील बॅच नंबर वरुन गुन्ह्यांचे घटनास्थळ ते वाशिम व पुसद रोडवरील हॉटेल, धाब्याची तपासणी करण्यात आली त्यावेळी अनोळखी मृतक यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करुन मृतक कोणत्या भागातील आहे याची निश्चीती केली. त्यानंतर सदर गुन्ह्यांचे ठिकाणी मिळून आलेली DREAM कंपनीची रिकामी पाण्याची बॉटल तसेच EURO कंपनीची मुंगडाळ कोणत्या भागात विक्री होते त्याची माहीती घेतली असता सदरचे पाण्याची बॉटली हिंगोली जिल्हात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यावरून अनोळखी मृतक यांची ओळख पटविण्याकामी हिंगोली परिसरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना होवून माहीती घेत असतांना सदर गुन्हयातील मृतक यांचे नाव मंगेश ऊर्फ काल्या अर्जुन मनवर वय ३५ वर्ष, रा. सिध्दार्थ नगर हिंगोली ता.जि. हिंगोली येथील असल्याचे तसेच त्याचे नातेवाईकांने त्याचे कपडे पाहणी ओळखल्याने मृतक यांची ओळख पटविली.

त्यानंतर दि,७ ऑगस्ट २०२६ रोजी सदर तांत्रीक विश्लेषन व गोपनिय प्राप्त केली असता सदर गुन्हयातील मृतक यांस आरोपी अजय भालेराव, राधा भालेराव, बाबू शेख, यांनी ज्ञानेश्वर राठोड यांच्या मार्फतीने जिवेठार मारण्याकरीता सहा लाख रुपये सुपारी देवून कट रचल्याचे नमूद पथकांस गोपनिय माहीती प्राप्त झाल्याने सदर गुन्हयातील आरोपी निष्पन्न करुन १) ज्ञानेश्वर मोहनसिंग राठोड याची गोपनिय माहीती काढून त्यास ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन विचारपूस केली असता सदरचा गुन्हा आरोपी २) राहूल ऊर्फ महाराज मुकदा लोखंडे रा. वसंतनगर उमरी ता. मानोरा जि. वाशिम ३) श्रावण तुकाराम भवाळ रा. उमरी ब्रु ता. मानोरा जि. वाशिम, ४) सोमनाथ संगित हजारे, रा. शेंदोना ता. मानोरा ५) विशाल अर्जुन राठोड रा. शेंदोना ता. मानोरा ६) अर्जुन अशोक शेळके रा. उमरी खुर्द ता. मानोरा ७) दिपक लक्ष्मण जाधव रा. मांगकिन्ही ता. दारव्हा ८)शुक्रधन ऊर्फ सिध्दार्थ संतोष जाधव रा. दिग्रस गंगानगर ता. दिग्रस यांनी केला असल्याचे निष्पन्न करुन सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे. नमूद पथकांने गुन्हा घडल्यापासून वाशिम, हिंगोली, परभणी परिसरात रवाना होवून अतिशय क्लीष्ट असलेला व कोणताही पुरावा नसतांना अतिशय चिकाटीने पोलीस कौशल्याचा वापर करुन DREAM कंपनीची रिकामी पाण्याची बॉटल तसेच EURO कंपनीची मुंगडाळ कोणत्या भागात विक्री होते त्याची माहिती काढून पोलीस स्टेशन खंडाळा अप क्रमांक ३४९/२०२६ कलम १०३ (१) भान्यास या गुन्हयातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून अज्ञात आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणून नमूद आरोपी यांस ताब्यात घेवून पुढील तपास कामी पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात दिले.

सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो. से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद, अमर मोहीते सा, तसेच मा. पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, सपोनि विनित घागे, ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा, पोउपनि अमोल राठोड, सफी मुन्ना आडे, सफो संतोष भोरगे, सफी राहुल गोरे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोह दिंगाबर पिलावन, पोशि महेश वाकोडे, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close