ईतर

पुसद न.प.नगरसेवक ॲड. वसीम अहमद यांची जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदी नियुक्ती

पुसद:यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नुकतीच प्रसिद्ध झालेल्या जिल्हा कार्यकारणी मध्ये पुसद नगर परिषद नगरसेवक ॲड.वसीम अहमद यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे परिसरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.ॲड. वसीम अहमद काँग्रेस पक्षात जिल्हा सचिव पदी कार्यरत होते यांनी सामाजिक, कायदेविषयक तसेच पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांचे अनेक सामाजिक संघटना सोबत काम केल्याचा अनुभव असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.या नियुक्तीबद्दल त्यांनी पक्ष नेतृत्व व जिल्हाध्यक्ष ऍड. सचिनजी नाईक यांचे आभार माणले.त्यांच्या नियुक्तीने विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close