महसूल दिनी रोहडा येथील पोलीस पाटील राजकुमार पारीस्कर यांचा सत्कार!

पुसद : महसूल दिनानिमित्त यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दिनांक 3 ऑगस्ट रोजी पुसद तालुक्यातील माळ पठारावरील रोहडा येथील तरुण पोलीस पाटील राजकुमार पारस्कर यांचा सेवा ,समर्पण आणि उत्कृष्ट कार्याची पावती म्हणून जिल्हाधिकारी विकास मिना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
दि.१ ऑगस्ट महसूल दिना चे औचित्य साधून पुसद तालुक्यातील उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल व पुसद तहसीलचे कोलेवाड तसेच खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत माळपठारावरील रोहडा गावचे पोलीस पाटील राजकुमार सितारामजी पारिसकर त्यांच्या प्रामाणिक , कर्तव्यदक्ष व उत्कृष्ट पोलीस पाटील, उत्कृष्ट कामगिरी, केल्याबद्दल यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव पोलीस पाटील यांचा जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या हस्ते
व प्रमुख उपस्थितीत यवतमाळ जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक कुमार चिंता व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पोलीस पाटील राजकुमार पारिसकर यांचा यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव सर्वोत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून सत्कार झाल्याबद्दल तालुक्यात सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



