पुसद शहरातील ‘जिम टोळी सक्रिय’ सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट म्हणजे ‘खोदा पाहड निकाला चुआ’पोलीसांनी केला पर्दाफाश!
बदनामीकारक पोस्ट व्हायरल करणाऱ्या तथाकथित युवा सामाजिक कार्यकर्त्या संतोष राठोड यांनी मागितली माफी!

पुसद : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात माहिती महत्वाचे साधन झाले आहे. मग ही माहिती विविध माध्यमातून मिळत असते. आता सोशल मीडिया महत्वाचे माध्यम झाले आहे. यामुळे कोणतीही बातमी काही मिनिटांत मोठ्या समुदायापर्यंत पोहचत असते. अनेक जण आलेल्या माहितीची खातरजमा करण्याचे कष्ट न घेता ती फॉरवर्ड करण्याचे काम करतात. परंतु सोशल मीडियावरील माहिती काळजी न घेता लाईक करतात व ही माहिती पोस्ट पुढे शेअर करतात पाठवताना यासाठी आजकाल युझर्स काय करतील, याचा काही नियम राहिला नाही. केवळ फेमस होण्यासाठी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणं कधी तरी खूपच महागात पडू शकतं.असाच काहीसा प्रकार मागील काही दिवसांपासून पुसद भागात घडलाय. तिथे एका तथाकथित युवा कार्यकर्त्यांनी पुसद शहरातील जिम टोळी सक्रिय या मथळ्याखाली फेसबुक सोशल मीडियावर पोस्ट फॉरवर्ड, व व्हायरल करून शहराचे वातावरण खराब केले होते. त्यामुळे या सोशल मीडियावर अनेक युजर्सने या पोस्ट बाबत कोणतीही खातरजमा न करता लाईक व शेअर करत अनेक प्रतिक्रिया दिल्या होत्या त्यावेळी प्रसार माध्यमाला या प्रकरणाची पहिले धक्कल घेतल्याने पुसद पोलीस प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर आल्याने या प्रकरणाचा पडदा पास केला असता ‘खोदा पहाड, निकला चूहा’ (डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला) या हिंदी म्हणीचा वापर फेसबुकवर या पोस्ट्स किंवा बातम्यांसाठी केला गेला आहे जिथे खूप मोठी चर्चा, दावे किंवा अपेक्षा निर्माण केल्या गेली होती परंतु प्रत्यक्षात मिळणारा परिणाम अत्यंत नगण्य किंवा फोल ठरला असून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करणाऱ्या तथाकथित युवा कार्यकर्त्यांने भर पत्रकार परिषदेत या व्हायरल पोस्ट बाबत पुसद शहरवासीयाची तसेच पोलिसांची माफी मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा पुसद पोलिसांनी पर्दाफाश केला असल्याची माहिती दि.१७ एप्रिल रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
आजच्या काळात सोशल मीडिया सध्या महत्वाचे समाजमाध्यम झाले आहे. परंतु सोशल मीडियावर पोस्ट टाकताना अनेकजणं काळजी घेत नाही.व आलेल्या पोस्ट पुढे फॉरवर्ड करण्याचे काम करतात. परंतु आता दक्ष नागरिकांनी काळजी घ्या अन्यथा एखादी पोस्ट तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते आता तुमच्या प्रत्येक पोस्टवर पोलिसांची करडी नजर आहे. अशीच सोशल मीडियावरील पोस्ट तथाकथित युवा कार्यकर्त्यांनी व्हायरल केल्याने पुसद परिसरात या वायरल पोस्ट बाबत मोठे दावे, केले होते परंतु या व्हायरल पोस्ट शून्य परिणाम झाला आहे.
खोदा पहाड, निकला चूहा’ (डोंगर पोखरला आणि उंदीर निघाला) या हिंदी म्हणीचा वापर फेसबुकवर केला आहे.या व्हायरल पोस्टची जिथे खूप मोठी चर्चा, दावे किंवा अपेक्षा निर्माण केल्या गेली परंतु प्रत्यक्षात मिळणारा परिणाम अत्यंत नगण्य व फोल निघाला आहे. सोशल मीडियावर महिलांच्या शोषणाबाबत करण्यात आलेल्या भ्रामक पोस्टप्रकरणी तथागतिक युवा सामाजिक कार्यकर्ता संतोष दशरथ राठोड यांनी माफीनामा सादर केला असून पुसद शहरात या प्रकरणाची मोठी चर्चा रंगली आहे १० ते १६ एप्रिल २०२६ दरम्यान करण्यात आलेल्या पोस्टमुळे शहरासह परिसरात खळबळ उडून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या संदर्भात प्रसारमाध्यमांनी आपली सामाजिक जबाबदारी सांभाळून बातम्याही प्रकाशित केल्या होत्या त्यावेळी पुसद पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आले आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी तात्काळ विशेष पथके नेमून तपास केल्यानंतर या वायरल पोस्ट पोस्टमधील आरोपांमध्ये तथ्य आढळून आले नाही संतोष राठोड यांनी फेसबुकवर टाकलेल्या विविध पोस्टमधून जिममध्ये शरीरयष्टी कमावणाऱ्या एका विशिष्ट टोळीमार्फत महिलांना जाळ्यात ओढले जात असून ही टोळी माजी आमदार व पदाधिकाऱ्यांच्या सोयीसाठी वापरली जाते, तसेच प्रशासन लोकप्रतिनिधींच्या प्रभावाखाली असल्याचे आरोप केले होते. दि. १० एप्रिल रोजी तीन, ११ एप्रिल रोजी एक, १५ एप्रिल रोजी एक आणि १६ एप्रिल रोजी तीन अशा एकूण आठ पोस्टमुळे शहरात खळबळ उडाली.या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे. यांच्या मार्गदर्शनाखाली वसंतनगर पोलीस ठाण्यात दोन विशेष पथके नेमण्यात आली. तपासादरम्यान दिग्रस येथील एका पीडित महिलेने तिच्या परवानगीशिवाय अश्लील व्हिडिओ पॉर्न साइटवर अपलोड केल्याची फिर्याद दिल्याचे समोर आले. त्यावरून पो. स्टे. दिग्रस येथे अप. क्र. ५६/२६ अन्वये भा. दं. सं. कलम ७४, ७९, ३५१(४), ३५६(२) तसेच आयटी अँक्ट कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली असून तो सध्या जामिनावर आहे.तपासात असे निष्पन्न झाले की, संबंधित पीडित महिलेने कोणत्याही जिमचे किंवा राजकीय व्यक्तींचे नाव घेतले नव्हते. मात्र, अधिक कठोर कारवाई व्हावी या उद्देशाने तिने ही माहिती संतोष राठोड यांना दिली होती. त्यानंतर राठोड यांनी चुकीच्या समजुतीतून फेसबुकवर भ्रामक पोस्ट केल्याचे पोलिसासमोर स्पष्ट केले.
पोलिसांनी पुरावे सादर करण्यास सांगितले असता राठोड यांनी कोणताही पुरावा दिला नाही. उलट पोस्ट सुरूच ठेवल्याने त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यांनी चुकीची माहिती मिळाल्यामुळे पोस्ट केल्याची कबुली दिली.राठोड यांनी लेखी माफीनामा देत, “चुकीच्या माहितीच्या आधारे पोस्ट केल्या असून माझी चूक मान्य करतो. भविष्यात अशी चूक होणार नाही,” अशी ग्वाही देत पुसदकर, पोलीस व प्रशासनाची माफी मागितली. त्यांनी हा माफीनामा फेसबुकवरही प्रसारित केला आहे.
पोलिसांनी स्पष्ट केले की, पुसद येथे सोशल मीडियावर सांगितल्याप्रमाणे कोणतीही घटना घडलेली नाही. महिलांबाबत पोलीस प्रशासन अत्यंत संवेदनशील असून अशा प्रकरणांमध्ये स्वतःहून कारवाई करण्यात येत असल्याचेही नमूद करण्यात आले. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शंका असल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. विशेष म्हणजे तथाकथित स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणारा संतोष राठोड हा सुद्धा क्रिमिनल प्रवृत्तीचा असून त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल असून महिलाच्या छेडखानीबाबत तो येरवडा तुरुंगात ही काही दिवस घालवलेला व्यक्ती असून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतः चा फोटो सुध्दा बनावट तयार केला आहे. सोशल मीडियावरील पोस्टवर व्हायरल केला आहे. अशा मानसिकतेच्या व्यक्तीने पुसद शहराचे वातावरण गढूळ केले होते त्यामुळे या प्रकरणाचा पोलिसांनी वेळीच पर्दाफाश केल्याने शहरातील व परिसरातील मोठा तणाव कमी झाला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी. जे. यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे, सेवानंद वानखडे, सपोनि सुगत पुंडगे, पोउनि शिवप्रसाद आवळकर, आनंद चंदेवाड, पोना सुरेश राठोड, पोना अरविंद चव्हाण, पोना नितेश भालेराव, पोकॉ सुनिल मोरे, पोहवा पंकज तळेकर, मपोकॉ सुनिता राऊत, मपोकॉ अश्विनी वनेरकर आदींनी अथक परिश्रम घेतले.



