क्राइम

अवैधरीत्या धारदार लोखंडी तलवार बाळगणारा इसम पोलिसांच्या ताब्यात; उमरखेड पोलिसाच्या डीबी पथकाची कारवाई!

उमरखेड/प्रतिनिधी : अवैधरित्या धारदार लोखंडी तलवार बाळगणाऱ्या एका इसमास डी.बी. पथकाने ताब्यात घेतले. या इसमाविरुध्द उमरखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा इसम पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना दिसला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याला ताब्यात घेण्यात आले.
याबाबत ‘झेप’ न्यूजला पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि.१जुलै२०२६ रोजी रात्री उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये डि.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी.बी. स्टाफ असे रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना गोपनीय बातमीदारांकडून माहीती मिळाली की, उमरखेड ढाणकी रोडवरील ढाणकी पुलाचे खाली इसम नामे शेख जिब्राल शेख रहीम रा. उमरखेड हा स्वतः जवळ धारदार लोखंडी तलवार बाळगून आहे, यावरून ठाणेदार पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ साहेब यांना माहीती देवून त्यांचे आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे व डी.बी. स्टाफ यांनी पंचासह रवाना होवून उमरखेड ढाणकी रोडवरील ढाणकी पुलाचे खाली रात्री २३.०० वा. दरम्यान सापळा कारवाई करून मिळाले माहीती प्रमाणे इसम नामे शेख जिब्राल शेख रहीम वय. २४ वर्ष, रा. आयबाब कॉलनी उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ यांस ताब्यात घेवून त्याची झडती घेतली असता त्याचेजवळ एकूण २८ इंच लांब व १.५ इंच रूंदीची धारदार लोखंडी तलवार कि.रु.५००/- ची मिळून आली ती पंचनामा करून जप्त करण्यात आली असुन, त्याबाबत उमरखेड पोलीस स्टेशन अपराध क.५९२/२०२६ क.४/२५ भा.ह.का. प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.आशा प्रकारचे घातक शस्त्रे, अग्निशस्त्र तसेच इतर प्रकारचे अवैध्य काम कोणी करत असेल तर त्याची तात्काळ माहीती पोलीस स्टेशन उमरखेड येथे कळविण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. सदरची कारवाई मा. कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा. अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, मा हुनमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड, मा. शंकर पांचाळ पोलीस निरीक्षक उमरखेड यांचे मार्गदर्शनाखाली डी.बी. प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, पो. हवा. चंदन जाधव, पो. ना. दिपक वाघमारे, पो.कॉ. दिगांबर गिते, पो.कॉ. संघशील टेंबरे, चापोका रूद्रा वानखेडे सर्व उमरखेड पोलीस स्टेशन यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close