नवरात्रोत्सवात राज्यात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमदार ॲड.निलयभाऊ नाईक यांना मंत्रीपद मिळणार राजकीय वर्तुळात चर्चा!

पुसद: गेल्या काही दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. दरम्यान, अजित पवार गट, शिंदे गट आणि भाजपकडून देखील याबाबत दबाव वाढत असल्याचे म्हटले जात आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवरात्रोस्तवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता आहे. अवघ्या काही दिवसांवर नवरात्रोत्सव आहे. या नवरात्रोत्सवात मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपला ६ ते ७ मंत्रिपदं मिळणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे.या महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू विदर्भातुन एकमेव भारतीय जनता पक्षाचे बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट असलेले पुसदचे विधान परिषद सदस्य आमदार ॲड. निलयभाऊ नाईक यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या मंत्रिमंडळाच्या विस्तारात एकूण १४ मंत्र्यांची वर्णी लागणार असुन त्यामध्ये भाजपाला ६ते७व मित्र पक्षांना ८ मंत्रीपद मिळणार आहेत. विदर्भातून भाजपा बंजारा समाजाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी आमदार ॲड.निलय नाईक यांची मंत्रीपदी नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपाचे मंत्री कमी आहेत आणि आमदार जास्त आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागास प्रवर्गातून यवतमाळातून संजय राठोड यांची मंत्री म्हणुन नियुक्ती झाली तर भाजपच्या कोट्यातुन आमदार ॲड. निलय नाईक यांना सुध्दा घेण्यात यावे अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ॲड.निलयभाऊ नाईक समर्थक करीत असून मागील निवडणूक काळात भर सभेत पुसदच्या जनतेला फडणवीस यांनी दिलेल्या शब्दाला पाळावे कारण “बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ असेही ॲड. निलय नाईक यांच्या चाहत्यांकडून मागणी केली जात आहे.हे फडणवीस गटाचे गणले जातात. ॲड . निलयभाऊ नाईक यांना भाजपने विधान परिषदेवर घेतले परंतु विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा संधी दिली होती. या संधीचे सोने करीत ॲड.निलयभाऊ नाईक यांनी प्रयत्न केला आणि पुसद विधान सभा मतदारसंघात ८० हजार मते मिळविली.जर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जरा अधिक जोर जोमाने लावला असता तर ॲड.निलयभाऊ नाईक हे निवडून आले असते व आज हा मतदारसंघ भाजपाचा आसता परंतु भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी हलगर्जी केल्याने हा मतदारसंघ संघ भाजपाच्या हातातुन निसटला तरही ॲड.निलयभाऊ नाईक यांनी स्वराज्य संस्थेत तसेच मतदार संघात भाजपाचे बळ वाढविले. विशेषतः पुसद न. प. मध्ये १०, जि. प. २ व पं. स. मध्ये ८ सदस्य निवडून आणले होते. एवढेच नव्हे तर विदर्भ मराठवाड्यातील पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी त्यांनी परिश्रम घेतले. सध्याचे युग हे ओबीसींना न्याय देण्याचे आहे. जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी होत आहे. विदर्भ व मराठवाड्यात बंजारा समाजाचेमते मोठ्या प्रमाणात आहेत आणि ॲड . निलयभाऊ नाईक हे बंजारा विमुक्त जातीचे असुन नाईक घराण्याचे वारसदार असल्याने त्यांचा समाजसेवेचा दांडगा अनुभव आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गट आग्रही असल्याचे बोलल्या जात आहे. उच्च विद्या विभूषीत सुस्वभावी, संघटन कौशल्य व वक्तृत्व चांगले आहे. यापुर्वी जि. प. चे अध्यक्ष म्हणुन एक टर्म यशस्वी कामगिरी केली आहे. तसेच पुष्पावंती सह. साखर कारखान्याचे अध्यक्षपदही भूषविले आहे. त्यांची नाळ आजही जमीनीशी जुडलेली आहे. ॲड निलयभाऊ नाईक यांच्यासासख्या आमदारांची वर्णी जर मंत्रीपदी लागली तर ते सर्वसामान्यांना न्याय देऊ शकतील ना. नितीन गडकरी सुध्दा आमदार निलयभाऊ नाईक यांच्या बाबतीत सकारात्मक राहतील असे बोलल्या जाते. तसेच भाजपाच्या कोट्यातून आ. आशिष शेलार, आ. डॉ. कुटे, आ. प्रविण दरेकर, आ. राम शिंदे, आ. प्रताप लाड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.



