ईतर

पुसद येथे सामुहिक ग्रामगीता पारायण ;गुरुदेव सेवा मंडळाचा पुढाकार 

पुसद : श्री गुरुदेव सेवा मंडळ, तालुका शाखा पुसदच्यावतीने शहरालगतच्या अमरनगर (श्रीरामपूर) मधील हनुमान मंदिरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २४ ते २८ एप्रिल या कालावधीत राष्ट्रसंतरचित ‘ ग्रामगीता’ ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.येथील हभप विठ्ठल महाराज भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सामुहिक ग्रामगीता पारायणामध्ये दररोज सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत २५ महिला व पुरुष सेवेकरी सक्रीय सहभागी असतात. या सप्ताह काळात हभप विठ्ठल महाराज भोयर व गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचार प्रमुख राजेंद्र काळबांडे अखंड ग्रामगीता पारायण व निरुपण करीत असल्याने गुरुदेव अनुयायांची गर्दी वाढत आहे. २८ एप्रिल रोजी ग्रामगीता पारायणाची सांगता महाप्रसादाने होणार असल्याची माहिती हभप विठ्ठल महाराज भोयर यांनी दिली.

     पुसद शहरात पुढाकार घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजलिखित ग्रामगीता ग्रंथाचे पारायण सुरू केल्याबद्दल प्रा प्रकाश लामणे यांनी आनंद व्यक्त करून आयोजकांचे आभार मानले.याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुरुदेव सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा शाल, श्रीफळ व ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा प्रकाश लामणे, उपाध्यक्ष प्रा नंदकुमार खैरे, सचिव ॲड गजानन साखरे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर सुरडकर, भजन प्रमुख माधवराव जाधव, सदस्य नंदकुमार पंडित, रमेश सरागे, नरेश ढाले, निळकंठ घाडगे पाटील, जी पी सारवटे, रवी कानिंदे, माया काळबांडे, मंगला पंडित, कल्पना भोयर, प्रज्ञा चौधरी , सविता राठोड, शारदा साठे, यशोदा मस्के, शकुंतला उन्हाळे, कांताबाई अनखुळे, रुख्माबाई पारडेवाल, उषा उमप, विभा भरकाडे, वर्षा ठाकरे, करुणा मोरे, मुक्ता भोयर, आराध्य चौधरी, आसावरी चौधरी, अश्विन मोरे, रामदयाल महाराज आदी उपस्थित होते.पसायदान व राष्ट्रवंदनेने सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close