दुचाकींची समोरासमोर धडक, भिषण अपघात २ ठार १ जखमी!

पुसद: तालुक्यातील सांडवा मांडवा रोडवर दुचाकींचा भीषण अपघात झाल्याची घटना दि.१५ सप्टेंबर २०२३रोज शुक्रवार रात्री अंदाजे ८.३० वाजताच्या सुमारास घडली यात दोन युवक ठार तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे.
प्रवीण वामन जाधव वय ३० वर्ष राहणार इनापूर आणि शेख शहाबोद्दीन शेख बाबू वय ३२ वर्ष राहणार मांडवा हल्ली मुक्काम बंजारा हिल पुसद असे मृतकाचे नाव आहे . तर सदर अपघातात प्रवीण जाधव यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. प्राप्त माहिती अशी की, पुसद येथून सांडवा मांडवा रोडने प्रवीण जाधव त्यांची दुचाकी क्रमांक एमएच २९ – बीए १७७९ ने इनापूर येथे जात होते तर समोरून शहाबोद्दीन हे त्यांची दुचाकी क्रमांक एमएच – २९ बीजी – ७४७६ ने पुसदकडे येत असताना दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक बसली या अपघातात दोघांचा ही जागीच मृत्यू झाला तर प्रविण जाधव यांची पत्नी देखील गंभीर झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास पुसद ग्रामीण पोलिस करीत आहे.



