खळबळजनक! आंब्याच्या झाडाला तरुणांने गळफास घेऊन आयुष्याची केली अखेर ;आत्महत्या कां केली याचे कारण अद्यापही अस्पष्ट!
खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना..

पुसद:तालुक्यातील माळ पठारावरील रोहडा येथील शेतशिवारातील आंब्याच्या झाडाला एका ३४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आयुष्यची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव गणेश विष्णू गोरे (वय ३४, मूळ रा. पार्डी येथील रहिवासी आहे. 
याबाबत झेप न्यूज सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुसद तालुक्यातील माळ पठारावरील रोहडा येथील शेतशिवारातील शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका ३४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी घडल्याचा अंदाज असून ४ एप्रिल रोजी सकाळी ती समोर आली.मय्यत गणेश विष्णू गोरे (वय ३४, मूळ रा. पार्डी) येथील रहिवासी असून तो आईच्या वडीलाकडील वडीलोपार्जित जमीन कसत होता दि. ३ एप्रिल रोजी सायंकाळी शेतात जागरणासाठी शेतावर गेला असता तो सकाळी घरी परतला नसल्याने ४ एप्रिल रोजी सकाळी सुमारे ८:०० वाजण्याच्या सुमारास त्याची आई शेतावर त्याला पाहण्यासाठी गेली असता, आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. हे दृश्य पाहताच त्याच्या आईने आक्रोश सुरू केला त्यावेळी स्थानिकांना माहिती कळताच गावातील पोलीस पाटील व सरपंच यांनी घटनास्थळी पोहोचून तात्काळ खंडाळा पोलीस स्टेशनला प्रथम खबर दिली त्यावेळी पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह खाली उतरवून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह डॉक्टरांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिला मात्र यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.पंरतु खंडाळा पोलीसांनी स्टेशन डायरीत मर्ग दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. त्याच्या मृत्यू पश्चात पत्नी, एक मुलगा, आई-वडील व एक भाऊ असा परिवार असून त्यांच्या व्यावसाय शेती असल्याची माहिती समोर आली आहे.



