पुसद ते हिंगोली मार्गावर सांडवा येथे दोन घरात घुसला मालवाहू ट्रक; सुदैवाने जीवित हानी टळली!

पुसद : हिंगोली मार्गावरील सांडवा येथे ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक मालवाहू भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन घरात घुसल्याने मोठा आपघात घडला असून या घटनेत घरातील कुटूंब बालबाल बचावले आहे सुदैवाने जीवितहानी टाळली असून घर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे तर हा अपघात करून ट्रक चालक पसार झाला असल्याची माहिती असून ग्रामीण पोलीस ट्रक चालकाचा शोध घेत आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुसद ते हिंगोली मार्गाने दि.२७ ऑक्टोंबर रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास नांदेड वरून पुसद येथे मालवाहू ट्रक क्रमांक एम.एच.२६बि.ई.२३३५मालभरुन येत असताना सांडवा गावालगत घाटातील उतारावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा मालवाहू ट्रक थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन घरात घुसल्याने मोठा आपघात घडला असून या घटनेत घरातील कुटूंब बालबाल बचावले आहे सुदैवाने जीवितहानी टाळली असून घर मालकांचे मोठे नुकसान झाले आहे तर हा अपघात करून ट्रक चालक पसार झाला असल्याची माहिती असून पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनला स्थानिकांनी या घटनेची माहिती दिली असता घटनास्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेऊन कारवाई सुरू केली व ट्रक चालकाचा शोध घेत आहे.पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



