महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, डॉ. मोहम्मद नदिम यांची प्रदेश महासचिव पदी नियुक्ती!

पुसद: नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुसद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदिम यांना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश महासचिव पदी स्थान देण्यात आलं आहे. यवतमाळ जिल्हा काँग्रेसची बुलंद तोफ पुसदचे सुपुत्र सर्व सामान्यांचे नेतृत्व डॉ. मोहम्मद नदीम यांची सर्वदूर ओळख आहे पक्ष नेतृत्वाने त्यांच्या कामाची दखल घेत पुनःच प्रदेश महासचिव पदी त्यांना नियुक्त केले आहे. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकी झाल्या पक्षाला पराभव पत्कारावा लागला तरीही अशा परीस्थितीत ते आपले पाय रोवून उभे राहिले आहे परंतु पक्षातील अनेक मोठमोठे नेते पक्षाला सोडून सत्तेच्या लालसेपोटी सत्ताधारी पक्षात सामील झाले परंतु संकट समई पक्षा सोबत ठाम पणे उभे राहून पक्ष बांधणीत आपला योगदान देणाऱ्या पुसद नगर परिषदेचे माजी उपध्यक्ष काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद नदीम यांना पक्षाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवुन त्यांना पुनः प्रदेश महासचिव पदी नियुक्तीने दिली आहे.या नियुक्ती ने पुसद काँग्रेसला बळ मिळेल अशे सर्व सामान्य कार्यकर्ते व पदाधिकारी व नागरीकांचे मत आहे त्यांच्या या पुनः च निवडीमुळे त्यांचा चाहतावर्ग व पुसद काँग्रेस मध्ये आंनदाचे वातावरण आहे.डॉ. मोहम्मद नदीम यांनी आपल्या निवडीचे श्रेय राष्ट्रीय अध्यक्ष मालिकार्जून खरगेजी,नेते राहुल गांधीजी, प्रदेशअध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,तथा जिल्हाच्या वरिष्ठ नेतृत्वाला दिले.त्यांच्या निवडी बद्दल काँग्रेस पक्षाला नवे बळ मिळणार असल्याने सर्वच क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.



