ईतर

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीत ‘डिजे’चा दणदणाट करणाऱ्या; मंडळांच्या अध्यक्षांसह ‘डिजे’मालकांवर पोलिसांनी केले गुन्हे दाखल!

पुसद: शहरात दरवर्षी प्रमाणे १४एप्रिल२०२६ रोजी विश्वरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी शहरातील सर्व मंडळा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासने दिल्या होत्या ‘डीजे’चा कर्णकर्कश आवाज मर्यादेपेक्षा मोठ्या प्रमाणात गाणी लावून ध्वनी प्रदूषण केल्यास जे कुणीही नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस प्रशासनाकडून या मंडळांना आव्हान करण्यात आले होते परंतु मिरवणूक सुरू असताना काही मंडळांनी लावलेल्या ‘डीजे’चा कर्णकर्कश आवाज सुरू असल्याचे पोलिसांच्या पथकांनी ध्वनी मापक यंत्राद्वारे आवाजाची (डेसिबल) तीव्रता मोजली असता ती प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे दिसून आल्याने त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अनेक ‘डीजे’च्या मालकासह मंडळाचे अध्यक्षावर कळम २२३भा.न्या.सं. सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्रांनी ‘झेप न्यूज’ ला दिलेली माहिती अशी की,सार्वजनिक उत्सव व मिरवणुकांमध्ये आता पारंपरिक वाद्यांऐवजी डीजेचा दणदणाट होत आहे. पर्यावरण, ध्वनी प्रदूषण काद्यानुसार निर्बंध घातलेल्या डेसिबलच्या पुढे डीजेचा आवाज वाढविणे जीवितास हानीकारक आहे. त्यामुळे सर्वेाच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजेचे आवाज निर्बंध घातले आहेत त्याच अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी यवतमाळ यांनी पोलीस विभागाला सक्त निर्देश दिले होते की सार्वजनिक ठिकाणी मिरवणुकांमध्ये या ‘डिजे’ च्या मालकांकडून नियमांची पायमल्ली करून मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असेल तर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यामुळे या मिरवणुकीपूर्वी पोलिसांनी सर्व मंडळाला आव्हान केले होते शहरातील सर्व मंडळा नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना पोलीस प्रशासने दिल्या होत्या ‘डीजे’चा कर्णकर्कश आवाज मर्यादेपेक्षा मोठ्या प्रमाणात गाणी लावून ध्वनी प्रदूषण केल्यास जे कुणीही नियमाचे पालन करणार नाही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल परंतु मिरवणूकीत सहभागी झालेल्या ‘डीजे’मालक, व मंडळांचे अध्यक्षचे नावे खालील प्रमाणे आहेत त्यामध्ये १) जागो भिम सैनिक मंडळ, संभाजीनगर पुसद (१) सचिन शंकर राठोड, वय २८ वर्षे, रा. शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर (डिजे मालक)२) संकेत दिनेश वाघमारे, रा. संभाजीनगर पुसद (मंडळाचे अध्यक्ष)(२) नवयुवक मित्र मंडळ, भिमनगर पुसद,१) समर्थ मोहन चोरमले, वय- वर्षे, रा. भातपुडगाव, ता. सेवगाव, जि. अहील्यानगर (डिजे मालक) २) शुभम अशोक कांबळे, रा. भिमनगर पुसद (मंडळाचे अध्यक्ष)(३) निळे वादळ मंडळ, शिवाजीवार्ड पुसद१) हर्षल अशोक जाधव, वय अं. २४ वर्षे, रा. कराड, ता. कराड, जि. सातारा (डिजे मालक)२) सागर दशरथ साळवे, वय अं. ३२ वर्षे, रा. शिवाजीवार्ड पुसद यांचेवर (मंडळाचे अध्यक्ष) (४) फुले शाहु आंबेडकर विचारमंच मंडळ, पार्वतीनगर पुसद१) साई पंकज रत्ने, वय अं. १९ वर्षे, रा. श्रीरामपुर पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ (डिजे मालक) २) सागर उत्तम डाके, वय अं. ३५ वर्षे, रा. पार्वतीनगर पुसद (मंडळाचे अध्यक्ष)(५) पंचशिल मित्र मंडळ, मधुकरनगर पुसद सर १) मनोज वसंता चव्हाण, वय अं. २७ वर्षे, रा.वरुड, ता.पुसद,जि. यवतमाळ (डिजे मालक) २) दत्ता गंगाराम गायकवाड, वय अं. ३५ वर्षे, रा. मधुकरनगर पुसद (मंडळाचे अध्यक्ष) यांनी लावलेल्या ‘डीजे’वर कर्णकर्कश प्रमाणापेक्षा जास्त मोठ्या आवाजात गाणी लावून वाजविल्या प्रकरणी पोलीस पथकांने पथकांनी ध्वनी मापक यंत्राद्वारे आवाजाची (डेसिबल) तीव्रता मोजली असता ती प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे दिसून आल्याने त्यामुळे मा. जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी अनेक ‘डीजे’च्या मालकासह मंडळाचे अध्यक्षावर कळम २२३भा.न्या.सं. सहकलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागी पोलीस अधिकारी हर्षवर्धन बि. जे. साहेब पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलिस स्टेशनचे  पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांचे नेतृत्वात स.पो.नि. प्रेमकुमार केदार, पो. हे. कॉ. मनोज कदम, पो.ना. दिनेश सोळंके, पो.कॉ. सचिन राऊत, पो.कॉ. आकाश बाभुळकर, पो.कॉ. शुध्दोधन भगत, पो. हे. कॉ. मंदाकीनी भगत इ. यांनी सदरची कार्यवाही पार पाडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close